‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ या चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही वेगळी ठरली. या आगळ्यावेगळ्या आणि कथानुरुप गाण्यांची संगीतकार स्नेहा खानवलकर २३ जानेवारीला व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येत आहे. स्नेहाचे ‘ओ वुमनिया’, ‘कह के लुंगा’ ही गाणी सर्वाच्याच तोंडी आहेत. या गाण्यांच्या जन्मकथा आणि ही गाणी तयार करतानाचे अनुभव यावेळी तिच्याकडून जाणून घेता येतील.
‘तिच्या विजयासाठी’ अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला आहे. व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून आतापर्यंत अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, आघाडीची गायिका बेला शेंडे, आरजे मलिष्का, डॉ. रश्मी करंदीकर, दिग्दर्शिका गौरी शिंदे, पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर अशा मान्यवर महिलांशी संवाद साधण्यात आला आहे.
स्त्री संगीतकार म्हटले की उषा खन्ना यांचे नाव चटकन आठवते. मात्र हा अपवादच ठरावा. स्नेहा आज या क्षेत्रात स्वतला सिद्ध करू पाहते आहे. लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत या दोहोंचा मिलाफ करून स्नेहाने अनेक नवी गाणी आपल्यासमोर आणली आहेत. तिच्या याच संगीतमय प्रवासाविषयी वाचकांना अधिक जाणून घेता येणार
आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिराच्या पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये २३ जानेवारी या दिवशी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वाना खुला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
व्हिवा लाऊंजमध्ये स्नेहा खानवलकर!
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ या चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही वेगळी ठरली. या आगळ्यावेगळ्या आणि कथानुरुप गाण्यांची संगीतकार स्नेहा खानवलकर २३ जानेवारीला व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येत आहे.
First published on: 22-01-2013 at 03:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sneha khanvilkar is in viva lounge