मुंबईतील सुमारे १५ हजार उपकरप्राप्त इमारतींमधील तीन लाखाहून अधिक कुटुंबांना विमा संरक्षण देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. विम्याचा हप्ता इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून भरला जाणार आहे.
अशी एखादी इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास विम्याच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले.     अधिक पान ४
मुंबईकरांवर अतिरिक्त कर
एमएमआरडीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वापर करणाऱ्या नागारिकांवर अतिरिक्त कर (बेटरमेंट टॅक्स) लावणार.
सामायिक परिवहन सेवा
मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या काही महापालिकांची स्वंतत्र परिवहन सेवा आहे. या क्षेत्रात येणाऱ्या सर्व महापालिकांसाठी एकच वाहतूक सेवा तयार करुन ती बेस्ट सेवेशी जोडता येईल का याचा विचार केला जाईल.
एकच विकास नियंत्रण नियमावली
मुंबई महानगर क्षेत्रात आठ महानगरपालिका आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या विकास नियंत्रण नियमावली आहे. त्याऐवजी  सर्व महापालिकांसाठी एकच विकास नियमावली तयार करणार.