पोलिसांच्या फोर्सवन या विशेष दलामध्ये नियुक्तीला असलेल्या एका कमांडोने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 
नंदलाल सुनावणी असे या कमांडोचे नाव आहे. स्वतःजवळील बंदुकीतून सोनावणे यांनी शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडली. सोनावणे हे कलिना येथील पोलिस वसाहतीमध्ये राहात होते. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकारी चौकशी करीत आहेत. येत्या १२ मे रोजी नंदलाल यांचे लग्न होणार होते, अशी माहिती मिळाली आहे. मुंबईवर २६/११च्या हल्ल्यानंतर फोर्सवन कमांडो दलाची स्थापना करण्यात आली होती.
(संग्रहित छायाचित्र)