आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘सपोर्ट अ वुमन’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत निधी जमा करून ती रक्कम ग्रामीण भागातील मुली आणि महिलांच्या आरोग्यसेवेसाठी देण्यात येणार आहे.
‘सपोर्ट अ वुमन’ या अभियानांतर्गत ३३० रूपये एवढा निधी http://www.stayfreewomenforchange.com या संकेतस्थळावर जमा क रता येईल. या निधीतून ग्रामीण भागातील महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, वैद्यकीय तपासणी, याशिवाय, आयर्न-कॅल्शिअमयुक्त गोळ्या आधींचा पुरवठा करण्यात येणार आहे. अभिनेत्री साक्षी तन्वर ही अभियानाशी जोडली गेली असून या अभियानाच्या संकल्पनेपासून विस्तारापर्यंत प्रत्येक पावलावर कार्यरत असल्याचा अभिमान आपल्याला वाटत असल्याचे साक्षीने म्हटले आहे.