डोंबिवली येथील कचोरे भागात झोपडपट्टी गुंडांविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कचोरे येथील न्यू गोविंदवाडी परिसरात रजनी यादव यांची (४५) यांची झोपडी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुंड नरसिंग गायसमुद्रे (४२) यादव यांच्याकडे वारंवार ३० हजारांची खंडणी मागत होता. यामुळे त्रस्त झालेल्या यादव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हाच राग मनात ठेवून बुधवारी दुपारी यादव या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना चौघा तरुणांनी त्यांची झोपडी जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने झोपडीत असलेली यांदव यांची मुलगी मीना (१३) हिच्या हा प्रकार लक्षात आला आणि तिने बाहेर धाव घेऊन स्वत:चा जीव वाचवला. आजूबाजूच्या लोकांनी त्वरीत आग आटोक्यात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tried to fire of ladies house in dombivali