‘ती’च्या विजयासाठी अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला. आत्तापर्यंत व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, सुप्रिया सुळे, ख्यातनाम गायिका बेला शेंडे, आर जे मलिष्का, डॉ. रश्मी करंदीकर, दिग्दर्शिका गौरी शिंदे अशा मान्यवर महिलांशी आपण संवाद साधला. येत्या २६ डिसेंबर रोजी या कार्यक्रमात आपल्या भेटीस येतेय पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर. ऊर्मीच्या नावावर आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये  ‘रूल्स- प्यार का सुपरहिट फॉम्र्युला’, ‘ओए लक्की लक्की ओए’, ‘आय एम’, ‘शांघाय’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा आहेत. बॉलीवूडमध्ये लेखनाची संधी कशी मिळाली, पटकथा लिहीताना कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर असाव्या लागतात. चित्रपटाचे पटकथा लेखन आणि मालिकेचे पटकथा लेखन यामध्ये नेमका काय फरक असतो यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाणून घेता येणार आहेत ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून.
पु ल देशपांडे मिनी थिएटर, रविंद्र नाटय़मंदिर प्रभादेवी येथे हा कार्यक्रम दुपारी ३ वा. ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. सर्वाना या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला आहे.