डोंबिवली पूर्वेत चार रस्त्यावर एका हातगाडीजवळ आईस्क्रीम खात असताना एका तरुणीचा बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला धक्का लागला. यामुळे झालेल्या बाचाबाचीतून त्या अनोळखी तरुणाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.
अनोळखी व्यक्तीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजदे गावात राहणारी नेहा पतूरकर ही तरुणी चार रस्त्यावर आईस्क्रीम खाण्यासाठी आली होती. आईस्क्रीम खात असताना तिचा बाजूलाच उभ्या असलेल्या तरुणाला धक्का लागला. नजरचुकीने धक्का लागल्याचे सांगूनही त्या तरुणाने नेहाचे ऐकले नाही आणि तिला बेदम मारहाण करून तो पळून गेला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
तरुणीला मारहाण
डोंबिवली पूर्वेत चार रस्त्यावर एका हातगाडीजवळ आईस्क्रीम खात असताना एका तरुणीचा बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला धक्का लागला. यामुळे झालेल्या बाचाबाचीतून त्या अनोळखी तरुणाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.
First published on: 24-12-2012 at 02:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth beaten