भारतात जन्मलेल्या डॉ.पांडुरंग खानखोजे यांना भारतात परत येऊन आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.
१९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषीमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती,सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाडय़ातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभरची शेती पाहिली. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. िहदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले.पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.
१९५५साली ते खऱ्या अर्थाने भारतात परतले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले, ते १९६७ सालातील त्यांच्या मुत्यूपर्यंत.त्यांची मुलगी डॉ. सावित्री सहानी यांनी त्यांच्यावर ‘क्रांती आणि हरितक्रांती’ असे एक पुस्तक लिहिले असून वीणा गवाणकरांनीही ‘डॉ.खानखोजे-नाही चिरा..’ या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे.
    – अ. पां. देशपांडे    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २१ मे
१८७६> ‘आनंद’ या नावाने कविता करणारे, ‘बहन पिरोज’ ही कादंबरी लिहिणारे, परंतु समीक्षक म्हणून ठसा उमटविणारे नीळकंठ बळवंत भवाळकर यांचा जन्म. ‘विविधज्ञानविस्तार’च्या पहिल्या ५० वर्षांची लेखसूची, मध्यप्रदेशात प्रकाशित झालेल्या वाङ्मयाची पहिल्या ७५ वर्षांची सूची, चक्रधरांचा दृष्टान्तपाठ, लक्ष्मणान्वय सूत्रपाठ, आदी पुस्तकांचे ते अभ्यासू संपादक होत. १८९७> मराठी बालवाङ्मयाच्या प्रारंभिक वाटचालीतील एक लेखक व ‘खेळगडी’, ‘लोकमित्र’, ‘भाग्योदय’ मासिकांचे संपादक काशीनाथ रावजी पालवणकर यांचा जन्म. ‘टेकडीवरच्या गोष्टी’, ‘नदीकाठच्या गोष्टी’, ‘गच्चीवरल्या गोष्टी’ ही त्यांची पुस्तके.
१९२८ > कथा-कादंबरीकार व समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. चित्र-शिल्प, चित्रपट आणि नाटके यांच्या समीक्षेला वाङ्मयाच्या जाणकारीपेक्षा निराळे ज्ञान आवश्यक असते, हे त्यांनी ‘पिकासो’, ‘हिचकॉक’, ‘अश्वत्थाची सळसळ’आदी पुस्तकांतून दाखवून दिले.
१९५७ > बेने इस्रायली धर्माच्या ‘एस्तेर राज्ञी चरित्र’ व ‘दानिएलचे मानसिक धैर्य’ या  (मराठी) कीर्तनसंहितांचे लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचे निधन. तीन धार्मिक नाटकेही लिहून त्यांनी या धर्माला मराठीचा साज दिला.
संजय वझरेकर

जे देखे रवी..      अटकेपार
उलटे उलगडून केलेल्या त्वचारोपणाची सोमवारच्या लेखात वर्णन केलेली सुघटन शस्त्रक्रिया ळवफठ डश्एफोछअढ म्हणून प्रसिद्ध पावली. त्या काळात आमचा विभाग विद्यापीठमान्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी डॉ. आन्टिया नावाचे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व भेट देण्यास आले. त्यांनी या नव्या शस्त्रक्रियेने बरे झालेले रुग्ण तपासले आणि विद्यापीठाला ‘आणखी काय हवे आहे’ असा शेरा मारून हसतमुखाने निरोप घेऊन गेले. ‘कुष्ठरोग्यांसाठी शस्त्रक्रिया’ महत्त्वाचा ग्रंथ लिहिणारे हे डॉ. आन्टिया  काही वर्षांपूर्वी वारले.
सगळ्यात षटकार ठोकला माझ्या नंदू लाड नावाच्या मित्राने. ह्य़ाला हल्लीच पद्मभूषण मिळाले. त्याने मला जवळजवळ बळजबरीने ही शस्त्रक्रिया अस्थिव्यंगाच्या एका मोठय़ा परिषदेत दाखवण्यास भाग पाडले. याने वशिला लावून मला दहा मिनिटे दिली. वेळ होती सकाळी आठची. आदल्या रात्रीची मेजवानी बोटीवर होती. दाबून तीर्थप्राशन झाले होते. तेव्हा एवढय़ा पहाटे(!) सभागृहात पाचच माणसे होती. एक होता सत्राचा अध्यक्ष, एक बसला होता मायक्रोफोन सांभाळत, एक स्लाइड प्रोजेक्टरवर बसला होता. उरले दोन. त्यातला एक कोणी परदेशी गोरा होता. माझे सादरीकरण झाल्यावर माझे अभिनंदन करून गेला. दुसऱ्या दिवशी आमच्या कक्षात तोच गोरा माणूस आला आहे, अशी बातमी पसरली. मी भीतभीतच गेलो. त्या माणसाचे नाव होते ह्र’२ल्ल. तो म्हणाला, तू काल दाखवलेल्या रुग्णाचे मी छायाचित्र काढले तर चालेल का? तो होता जगप्रसिद्ध अस्थिव्यंगावरच्या पुस्तकाचा संपादक. मला म्हणाला, पुढची आवृत्ती सहा महिन्यांत निघणार आहे, त्यात मला ही तुझी शस्त्रक्रिया छापायची आहे. मी सहा अंगुळ्या हवेत चालू लागलो आणि म्हणालो, ‘अहो पण हा निबंध नियतकालिकातही (इ१्र३्र२ँ  ख४१ल्लं’  ऋ ढ’ं२३्रू र४१ॠी१८) प्रसिद्ध झालेला नाही.’ तेव्हा तो म्हणाला, ‘त्याची व्यवस्था मी करीन.’ मग छायाचित्रे काढण्यात आली आणि हा गेला. पंधरा दिवसांनी हं३२ल्ल खल्ली२’ डफळऌडढएऊकउर च्या पुस्तकाच्या प्रकाशकाचे पत्र आले आणि ६ महिन्यांतच माझी शस्त्रक्रिया जगभर चर्चेत आली. नंदू लाड माझा कर्ताकरविता ठरला, पण त्याबद्दल त्याने कधीही श्रेय घेतले नाही. हा हल्ली खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आणि समाजासाठी झटणारा डॉक्टर म्हणून सगळ्यांना माहीत आहे. माझे गुरू डॉ. डायस फारच समाधान पावले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, ‘आठवतं, तुला मी म्हटले होते, आपलीही वेळ येणार आहे. तशी आली; पण सांभाळून राहा. अजून खूप मजल मारायची आहे.’ पुढे हा निबंध इ१्र३्र२ँ ख४१ल्लं’ मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्या संपादकाची ओळख होणे स्वाभाविकपणे झाली. त्याचे नाव ट्रूँंी’ ळीेस्र्ी२३. त्यांच्याबद्दल लवकरच.
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे

वॉर अँड पीस                                                   मधुमेह : भाग १
मधुमेह हा एक ‘छुपारुस्तम’ आहे. शहरी, कृत्रिम राहणीचा हा विकार, शरीर केव्हा कुठपर्यंत पोखरत जाईल याची भल्याभल्यांना, वैद्यकीय क्षेत्रांतील जाणत्या वैद्य-डॉक्टरांना कल्पना येत नाही. मधुमेहाच्या व्यवहारातील सर्व परीक्षा नॉर्मल येत असूनही एकदम मधुमेह वाढतो; अर्धागाचा झटका येतो. हृदयाचा विकार बळवतो. एखादी जखम भरून न येणे किंवा मृत्यू येतो. याचे कारण मधुमेहाचे स्वरूप समजावून घेऊन शरीराला योग्य ते टिकावू बल देणारी योजना औषधी पथ्यापथ्य दिले जात नाही. अ‍ॅलोपॅथीच्या औषधात रक्तशर्करा केव्हा खाली जाईल, याची खात्री देता येत नाही. आयुर्वेदीय उपचारांत मधुमेहाचे नियंत्रण निश्चयाने होते. शरीराचे बल योग्य प्रकारे राखले जाते.आयुर्वेदीय औषधांतील घटद्रव्ये शरीरात लवकर सात्म्य होतात. ती निश्चितपणे अनपायी असतात. आयुर्वेदात मधुमेह हा वीस प्रमेह विकारांपैकी एक आहे. सर्व प्रमेह प्रकारांचे अंतिम रूपांतर मधुमेहातच होते, एवढे मधुमेहाचे महत्त्व आहे. मधुमेह हा विकार याप्य म्हणजे पथ्यपाणी, औषधे, पुरेसा व्यायाम केला असता नियंत्रणात राहणारा आहे. कायमचा पूर्ण बरा होणार नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहासारख्या घोर विकारात, स्वत:वर प्रयोग करू देण्याची, कै. वैद्य बापूराव पटवर्धन, बिरवाडी, ता. महाड यांची हिम्मत वाखाणण्याजोगी होती. बापूरावांच्या या प्रयोगयज्ञात मी काही वर्षे भाग घेतला. ते म्हणतील ती औषधे हरी परशुराम औषधालय व महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालयात आम्ही तयार करत गेलो.
माझ्या ‘लाल कागदावर’ मी कुपथ्य या सदराखाली, अनेक पदार्थाबरोबर अ‍ॅलोपॅथीच्या मधुमेह, ब्लडप्रेशर, थायरॉईड, कॅल्शियम, व्हिटॅमिन, पेनकिलर, वायसोलिन, दम्याचा पंप अशा विविध गोष्टी घ्यायला मनाई करतो. त्यामुळे माझीच आयुर्वेदीय औषधे घेऊन बरे वाटते कां हे बघता येते. आयुर्वेदाची चिकित्सा करावयाची, असे ठरविल्यावर चिकित्सा सुचते तशी आम्हाला सुचली. तसाच मार्ग सर्वाना सुचावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr pandurang khankhoje work in india