
अनेकदा ऑस्कर पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ'ला यावेळी 'द रिव्हनंट' मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. जगभरातील लिओनार्डोच्या चाहत्यांची निदान यावेळी तरी त्याला ऑस्कर मिळावा अशी मनापासून इच्छा होती. ओनार्डोच्या ऑस्कर विजयाने त्याच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्याला यापूर्वी विविध विभांगांमध्ये नामांकित करण्यात आलेल्या चित्रपटांवर नजर टाकूया. व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून नामांकन द एव्हिएटर- सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन ब्लड डायमंड- सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन द वोल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट- सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन 'द रिव्हनंट' या चित्रपटासाठी अखेर लिओनार्डोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
Oscar 2016.. अखेर लिओनार्डोला ऑस्कर मिळाला
Web Title: Oscars 2016 leonardo dicaprio wins his first oscar for the revenant