Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jai malhar special programme on zee marathi

खंडेरायाचा जागर ‘यळकोट यळकोट जय मल्हार’

विशेष आकर्षण ठरले ते खंडोबा, बानू आणि म्हाळसादेवींच्या मंचावरील प्रवेशावेळी सादर झालेलं समुहनृत्य.

March 5, 2016 15:30 IST
Follow Us
  • अवघ्या महाराष्ट्राचं अराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला. आज केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली आहे. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
    1/

    अवघ्या महाराष्ट्राचं अराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला. आज केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली आहे. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

  • 2/

    श्री खंडेराय म्हणजे साक्षात शिवाचा अवतार म्हणूनच या महाशिवरात्रीच्या निमित्ताने जय मल्हार मालिकेतील कलाकारांच्या सोबतीने रंगणार आहे ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ हा शानदार सोहळा. येत्या रविवारी ६ मार्चला महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

  • 3/

    श्री खंडेरायांच्या चरित्रातील आणि मालिकेतील काही प्रसंगांवर आधारित यळकोट यळकोट जय मल्हार हा सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सादर होणारा हा सोहळा खंडेरायांच्या भक्तगणांसाठी मनोरंजनाची एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे

  • 4/

    या सोहळ्यात जय मल्हार मालिकेतील सर्व कलाकारांनी आपली कला सादर केली.

  • 5/

    भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा मिलाफ असलेला ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ हा सोहळा येत्या रविवारी सायंकाळी ६ मार्चला झी मराठीवरून प्रसारित होईल.

  • 6/

    कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते खंडोबा, बानू आणि म्हाळसादेवींच्या मंचावरील प्रवेशावेळी सादर झालेलं समुहनृत्य.

  • 7/

    ‘अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी’ गाण्याच्या नादावर खंडोबा मंचावर आले आणि सर्वत्र यळकोट यळकोट जय मल्हारचा एकच जयघोष झाला.

  • 8/

    पालखीतून झालेले म्हाळसादेवींचे आगमन आणि ‘खंडेराया देव माझा मल्हारी’ म्हणत बानूने सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय कार्यक्रमात विशेष रंग भरले ते म्हाळसा आणि बानूच्या नृत्याच्या जुगलबंदीने.

  • 9/

    देवानंद माळी यांनी सादर केलेला खंडोबाचा पोवाडा, जेजुरीच्या कलावंतांनी सादर केलेलं जागर आणि गोंधळ, समुह नृत्यातील गणेश वंदना, नारदमुनींचं आख्यान, मालिकेत आजवर सादर झालेलल्या गाण्यांवरील नृत्यांसोबतच समूह तांडव नृत्य, गणोबा आणि रंगा या जोडगोळीची विनोदी प्रहसने आणि इतर अनेक आकर्षक गोष्टीही सादर झाल्या.

  • 10/

    लोकप्रिय गायिका नेहा राजपालने आणि ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी महाशिवरात्रीनिमित्त तयार केलेलं खंडेरायाचं एक विशेष गाणंही यात सादर केलं. याप्रसंगी मालिकेचे निर्माते तथा लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत मालिकेच्या निर्मितीमागच्या काही गोष्टीही सांगितल्या.

  • लोकप्रिय निवेदक आणि अभिनेता संकर्षण क-हाडे याने आपल्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात वेगळी रंगतही आणली.
  • 11/

    बानू

TOPICS
टेलिव्हिजनTelevision

Web Title: Jai malhar special programme on zee marathi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.