-
रणबीर कपूर आणि ऐश्वर्याची राय बच्चन यांची हॉट केमिस्ट्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियापासून ते अगदी चित्रपटवर्तुळामध्येही त्यांचीच चर्चा सुरु आहे. करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार एकत्र झळकणार असल्याची माहिती मिळताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. पण, या चित्रपटाची एक-एक झलक प्रेक्षकांसमोर आली आणि अनेकांना रणबीर-अॅशच्या जोडीने अक्षरश: भुरळच पाडली. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
'फिल्मफेअर' या मासिकासाठी या कलाकारांनी नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला. रणबीर आणि ऐश्वर्याची सिझलिंग केमिस्ट्री फोटोंमधून पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही रणबीर-अॅशचे फोटो वायरल झाले आहेत. या फोटोबद्दल खुद्द करण जोहरनेही ट्विट केले होते. 'तुम्ही या फोटोकडे पाहतच राहाल' असे कॅप्शन देत त्याने #ADHMOct28 #RanbirKapoor and #AishwaryaRaiBachchan असे लिहिले होते. (छाया सौजन्य- ट्विटर)
'ऐ दिल है मुश्किल'मधील या कलाकारांचे फोटो त्या मासिकाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. यासोबतच धर्मा प्रॉडक्शन आणि करणनेही त्यांच्या पेजवरुन हे फोटो शेअर केले आहेत. (छाया सौजन्य- ट्विटर) -
या मासिकातील सर्वच फोटो, मुख्यत्वे मुखपृष्टावरील फोटोने अनेकांचे लक्ष वेधत आहे.
-
मासिकातील हे फोटो पाहता रणबीर आणि ऐश्वर्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
दरम्यान, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानमुळे ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे येत असतानाच अखेर करण जोहरने या वादावर मौन सोडले आहे. माझ्यासाठी देश महत्त्वाचा असून मी सैन्याच्या जवानांना सलाम करतो. यापुढे मी शेजारी राष्ट्रातील कलाकारांसोबत काम करणार नाही असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले आहे. या सर्व वादामध्ये पाकिस्तानी कलाकारांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील भविष्य संकटात दिसत आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)
रणबीर-ऐश्वर्याची सिझलिंग केमिस्ट्री
‘फिल्मफेअर’ मासिकासाठी या कलाकारांनी नुकतेच एक फोटोशूट केले.
Web Title: Aishwarya rai ranbir kapoor photoshoot hot pics ae dil hai mushkil