-
रणवीर सिंगने त्याच्या आगामी बेफिक्रे चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये चित्रपटातील नवे गाणे खुलके ढुलके लाँच केल्यानंतर चित्रपटाच्या टीमने फॅशन शोचे आयोजन केले होते. यावेळी काही प्रतिष्ठित डिझायनरही उपस्थित होते. फॅशन शोचे शो स्टॉपर असलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूरने यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते.
-
रणवीर स्टेजवर येताच मुली त्याच्या नावाने ओरडू लागलेल्या. इतकेच नव्हे तर काही मुलींनी रणवीरवर असलेले त्यांचे प्रेमही व्यक्त केले. सदर शोनंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अशी कोणती 'बेफिक्रे' गोष्ट आहे जी तू भारतात केलीयेस असा प्रश्न त्याला करण्यात आला. त्यावर रणवीर म्हणाला की, जर मी तुम्हाला सांगितले तर मला तुरुंगात जावे लागेल.
शो दरम्यान रणवीर आणि वाणीने उपस्थितांसह खुलके ढुलके गाण्यावर ठुमके लावले. पूर्ण शोमध्ये रणवीरने त्याची छाप पाडली होती. यावेळी वाणी ही एका सुंदर आणि बोल्ड वधूच्या पोशाखात दिसली. -
आदित्य चोप्रा दिग्दर्शित बेफिक्रे येत्या ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
.. तर रणवीर तुरुंगात जाऊ शकतो
Web Title: Ranveer singh may have to go to jail here is why