• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. childrens day 2017 deva fame ankush chaudhary celebrate day with childrens

Childrens Day 2017 : ‘देवा’चे बच्चेकंपनीसोबत ‘बालदिन’ सेलिब्रेशन

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • लहानपण हे एका फुलासारखे असते... आणि त्याची आठवण म्हणजे त्या फुलांचा सुगंध ! अश्या या रंगबेरंगी फुलांसोबत 'देवा' फेम अभिनेता अंकुश चौधरीने नुकताच 'बालदिन' साजरा केला.
    1/6

    लहानपण हे एका फुलासारखे असते… आणि त्याची आठवण म्हणजे त्या फुलांचा सुगंध ! अश्या या रंगबेरंगी फुलांसोबत 'देवा' फेम अभिनेता अंकुश चौधरीने नुकताच 'बालदिन' साजरा केला.

  • 2/6

    आज १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असलेल्या 'बालदिन'चे औचित्य साधत, निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये काही गरजू आणि अनाथ मुलांबरोबर अंकुशने बालदिनाचा आनंद लुटला.

  • 3/6

    इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या अंकुशसोबत काहीवेळ घालवण्याची नामी संधी बच्चेकंपनीने पुरेपूर लुटली.

  • 4/6

    खास करून, निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफर त्यांना घडली. लोकांना मदत करणा-या 'देवा'ची भूमिका अंकुश त्याच्या आगामी सिनेमात साकारात असून, ख-या आयुष्यातदेखील तो अगदी 'देवा' या पात्रासारखाच आहे.

  • 5/6

    अंकुशने स्वतः त्याच्यापरीने अनेकांना मदत केली असून, सामाजिक कार्यातदेखील तो नेहमीच पुढे असतो. त्याच्या याच स्वभावामुळे अतरंगी 'देवा' ने साजरा केलेला 'बालदिन' त्याच्यासाठीदेखील एक खास दिवस ठरला. अंकुशने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी करत, त्यांना खाऊ आणि भेटवस्तूदेखील दिल्या.

  • 6/6

    मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमा येत्या १ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, तेजस्विनी पंडित हिची देखील यात प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Childrens day 2017 deva fame ankush chaudhary celebrate day with childrens

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.