• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mukkabaaz five reasons to watch the vineet kumar singh and jimmy shergill starrer

Mukkabaaz: अनुराग कश्यपचा ‘मुक्काबाज’ का पाहाल याची पाच कारणे?

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • विनीत कुमार सिंह, जिमी शेरगिल, रवी किशन आणि जोया हुसैन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुक्काबाज’ हा क्रीडाविषयक चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एका बॉक्सरची प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाच्या कथेला अनुराग कश्यपने ड्रामा, अॅक्शन आणि राजकारणाचा टच दिला आहे. समाजातील जीताप्रथेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहता अनुराग पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत त्याचा जम बसवण्यास सज्ज असल्याचे दिसते. ‘मुक्काबाज’ का पाहाल याची पाच कारणे खालीलप्रमाणे..
    1/6

    विनीत कुमार सिंह, जिमी शेरगिल, रवी किशन आणि जोया हुसैन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुक्काबाज’ हा क्रीडाविषयक चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एका बॉक्सरची प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाच्या कथेला अनुराग कश्यपने ड्रामा, अॅक्शन आणि राजकारणाचा टच दिला आहे. समाजातील जीताप्रथेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहता अनुराग पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत त्याचा जम बसवण्यास सज्ज असल्याचे दिसते. ‘मुक्काबाज’ का पाहाल याची पाच कारणे खालीलप्रमाणे..

  • 2/6

    अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मुक्काबाज’ चित्रपटाने विनीत कुमार सिंह मुख्य अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. याआधी 'इसाक', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'अग्ली' आणि 'बॉम्बे टॉकीज' या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची जादू पाहावयास मिळाली होती. चित्रपटात श्रावणची भूमिका साकारणारा हा अभिनेता तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतत आहे. चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय मिळावा याकरिता विनीतने पंजाबमध्ये बॉक्सिंगचे खडतर प्रशिक्षण घेतले. याव्यतिरीक्त तो चित्रपटाचा पटकथाकारसुद्धा आहे.

  • 3/6

    'गँग्स ऑफ वासेपूर', 'देव डी', 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटांसाठी अनुराग कश्यप नावाजला जातो. ‘मुक्काबाज’विषयी अनुराग म्हणालेला की, हा माझा पहिलाच प्रेम प्रधान चित्रपट आहे. गुंडगिरी आणि जातीवादावर खेळाडूंचा संघर्ष या क्रीडाविषयक चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.

  • 4/6

    ‘मुक्काबाज’ची कथा उत्तर प्रदेशमधील बरेली या छोट्याशा गावात घडते. जिथे एक क्षत्रिय जातीतील कुस्तीपटू (विनीत) ब्राम्हण असलेल्या मूकबधीर मुलीच्या प्रेमात पडतो.

  • 5/6

    बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये ‘मुक्काबाज’चे स्क्रीनिंग झाले असून, अनेकांनी या चित्रपटाची प्रशंसाही केली आहे. मुंबई फिल्म फेस्टीव्हल आणि टोरंटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. तसेच, या चित्रपटामुळे बॉक्स ऑफीसवर अनुराग पुन्हा एकदा दणक्यात कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • 6/6

    आपल्या अभिनयाने नेहमीच सर्वांना चकित करणारा जिमी शेरगिल हा यात उच्च जातीतील मिश्रा या डॉनची भूमिका साकारतोय. जो आपल्या भाचीला कमी लेखल्या जाणाऱ्या जातीतील श्रावणशी (विनीत) लग्न करण्यापासून रोखत असतो.

Web Title: Mukkabaaz five reasons to watch the vineet kumar singh and jimmy shergill starrer

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.