-
महिला दिनाचे निमित्त साधत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत बॉलिवूड थीमपार्क उभारण्यात आला.
-
अखंड बॉलिवूडचा नजराणा याची देही याची डोळा पाहण्याचा रंजक अनुभव महिलांनी घेतला.
-
एन.डी. फिल्म वर्ल्डच्या अंतर्गत, एन.डी. स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात आलेल्या या मायानगरीत, मराठी अभिनेत्री मानसी नाईकने बॉलीवूडच्या 'चांदनी' श्रीदेवी यांच्या गाण्यांवर नृत्य करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
-
भारतीय चित्रपटसृष्टीने सजलेला हा बॉलिवूड थीमपार्क आता प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. लोकांसमोर सादर झालेली ही फिल्मीदुनिया सिनेचाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या थीमपार्कच्या माध्यमातून आपल्या लाडक्या अभिनेत्यांचे सिनेमे, त्यांचे संवाद आणि अॅक्शन सिनेरसिकांना जगता येणार आहे. -
कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडून येणार असून, फिल्मी परेडचा रोमांचदेखील प्रेक्षकांना अनुभवता येईल.
-
या बॉलिवूड थीमपार्कात ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच अलिशान बंगले आहेत, ज्यात प्रेक्षकांना वावरतादेखील येणार असल्यामुळे, सिनेमातील जग आणि त्यातील पात्र तसेच बाजारपेठाची रंजक सफर करण्याची नामी संधी यात मिळणार आहे.
-
या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकांना स्वतः सहभाग घेता येणार आहे.
-
सिनेमातील पात्रांचा पेहराव आणि मेक-अप करण्याची संधी यात असून, आपल्या आवडत्या सिनेमात प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरण्याची मुभा यात प्रेक्षकांना देण्यात आली आहे.
-
तसेच, या फिल्मोत्सवात उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून, याची दखल बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाणार आहे.
-
फिल्मी डान्स, गायन, कॉमेडी, मुकद्दर का सिकंदर यांसारखे टॅलेंट शोदेखील यात असून, फिल्मोत्सवातील प्रत्येक सेक्शनमध्ये होणाऱ्या लाइव्ह प्रात्यक्षिकांमध्ये सिनेरसिकांना सहभागी होता येणार आहे.
एन. डी. स्टुडिओच्या या स्वप्नवतनगरीत येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या गरजेचा आणि मानसिकतेचा योग्य विचार करण्यात आला असल्याचे दिसून येते.
सिनेरसिकांसाठी ‘बॉलिवूड थीमपार्क’
भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर
Web Title: Nitin desai bollywood theme park in karjat