-
काळवीट शिकार प्रकरण, कारावास, न्यायालयीन फेऱ्या या सर्व गोष्टींतून मुक्त झाल्यानंतर अभिनेता सलमान खान मुंबईत परतला. आपल्या घरी परतल्यानंतर सलमानलचं चाहत्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत तो पुन्हा एकदा कलाविश्वात रुळल्याचं पाहायला मिळालं. 'रेस ३' या आगामी चित्रपटातील अभिनेता साकिब सलीम याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला सलमानची उपस्थिती पाहायला मिळाली. ही पार्टी जरी साकिबच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली असली तरीही पार्टीत स्वॅग आणि चर्चा मात्र भाईजानचीच पाहायला मिळाली. 'रेस ३' फेम साकिब सलीमला शुभेच्छा देण्यासाठी कलाविश्वातील इतरही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया- Varinder Chawla)
-
या खास पार्टीला सलमान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लूलिया एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. (छाया- Varinder Chawla)
-
अभिनेता बॉबी देओल आणि रितेश देशमुखही पार्टीला हजर होते. (छाया- Varinder Chawla)
-
पार्टीतून निघतेवेळी सलमान खान, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांना एकत्र पाहिलं गेलं. (छाया- Varinder Chawla)
-
सुनील शेट्टीनेसुद्धा या पार्टीला हजेरी लावली होती. (छाया- Varinder Chawla)
-
सुनील शेट्टीसोबतच त्याची मुलगी आथिया शेट्टीसुद्धा बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. (छाया- Varinder Chawla)
-
अभिनेता सूरज पांचोलीसुद्धा साकिबला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. (छाया- Varinder Chawla)
कारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन
‘रेस ३’ या आगामी चित्रपटातील अभिनेता साकिब सलीम याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला सलमानची उपस्थिती पाहायला मिळाली.
Web Title: Bollywood actor salman khan race 3 stars attend saqib saleems birthday bash