उत्तम अभिनय शैली आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वहिनीची माया' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. विजय चव्हाण यांची मोरुची मावशी आणि श्रीमंत दामोदर पंत ही नाटकं तुफान गाजली. मोरुच्या मावशी तर आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रानफूल, लाइफ मेंबर या मालिकाही गाजल्या. २०१७ चा 'संस्कृती कलादर्पण'च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित -
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘विजय’तारा निखळला
Web Title: Veteran marathi actor vijay chavan passes away his rare pics