-
भारतीय चित्रपट संगीत आणि एकूणच संगीत विश्वाला लाभलेली एक सुरेल दैवी देणगी म्हणजे लता मंगेशकर. कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. लतादीदींचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने लतादीदी यांना गौरविण्यात आलं आहे. त्यांच्यापूर्वी भारतीय संगीतातील योगदानाबद्दल एम.एस. सुब्बूलक्ष्मी यांनादेखील सन्मानित करण्यात आलं आहे. -
लता दीदींनी अखंड परिश्रमाने स्वतःच्या कुटुंबाचे नंदनवन केले. आज त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे संगीत क्षेत्रात सर्वात पहिला मान मिळातो तो मंगेशकर भावंडांना. संगीत कलेतील महान कुटुंब म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्या मागे ५० वर्षांहून अधिक काळाचा प्रदिर्घ कष्टमय इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचे चालते बोलते प्रतिक आहेत, 'गानकोकिळा' लता मंगेशकर.
गुलाम हैदर यांनी लतादीदींना 'मजबूर' (१९४८) ह्या चित्रपटात 'दिल मेरा तोडा' हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही दीदींना तालीम मिळाली आहे. दीदींनी गायलेल्या काही अजरामर गाण्यांपैकी `ए मेरे वतन के लोगो`. हे गाणं आजही ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यांतून आसवे ओघळतात. गीतकार प्रदीप यांनी हे गाणं शब्दबद्घ केलं असून हे गाणं ऐकताच पंडीत जवाहरलाल नेहरुही अक्षरश: गहिवरले होते. लतादीदींना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिलखुलास अभिनेते शम्मी कपूर आणि लतादीदींचे नाते बहिण-भावाचे. लतादीदींनी शम्मी कपूर यांच्या निधनानंतर तीव्र दु;ख व्यक्त केले होते.
Happy Birthday Lata Mangeshkar : सुरांना साद घालणाऱ्या लता दीदी
Web Title: Lata mangeshkar happy birthday lata didi