प्रसिद्ध रिअॅलिटी शो स्टार प्रिंस नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. 'बिग बॉस-९' सुरू असताना जवळ आलेली प्रिंस आणि युविकाची जोडी चांगलीच चर्चेत होती. त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नात युविकाने मरुन आणि गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर प्रिंसने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. या नव दाम्पत्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये रोडिज आणि बिग बॉसच्या माजी स्पर्धकांचाही समावेश होता. लग्नातील काही सोहळे मुंबईमध्ये पार पडले असून त्यांच्या मेहंदीचं फंक्शन चंदीगड येथे झालं होतं. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील काही कलाकारही यावेळी उपस्थित होते. यात अभिनेत्री तब्बू, सोहेल खान, सुनील शेट्टी, नेहा धुपिया यांचा समावेश होता. प्रिंस नरुला हे छोट्या पडद्यावरील नावाजलेलं एक नाव असून त्याने बिग बॉस ९ आणि रोडिज १२ चं विजेतेपदही पटकावलं आहे.
प्रिंस नरुला आणि युविकाच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का ?
Web Title: Prince narula and yuvika chaudhary marriage photos