अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी १ डिसेंबर आणि २ डिसेंबर रोजी जोधपूरमधील उमेद भवन येथे डेस्टिनेशन वेडींग केलं. त्यानंतर पहिल्यांदा या नवविवाहित दाम्पत्याला जयपूर विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी प्रियांकाने हातात लाल चुडा,गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदुर लावलं होतं. निकसुध्दा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्राऊन जॅकेटमध्ये दिसून आला. उमेद भवनमध्ये या जोडीने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. निक प्रियांकाने लग्नातील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये याकडे विशेष लक्ष दिलं होतं. या लग्नाला केवळ ८० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. लग्नानंतर मुंबई आणि दिल्ली येथे रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.
नवविवाहित निक-प्रियांकाची पहिली झलक
Web Title: Priyanka chopra nick jonas first photos after wedding