क्रिकेट या खेळावर आधारित 'मी पण सचिन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली असून नुकतंच त्यांनी शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. संपूर्ण टीमने प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत सामना खेळला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवर मात करत, हा अटीतटीचा सामना जिंकला. यावेळी दिग्दर्शक श्रेयश जाधव,अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव आणि कल्याणी मुळे यांनी सहभागी होऊन मॅचची रंगत अधिकच वाढवली. स्वप्नील जोशी 'सर्वोत्कृष्ट गोलंदाज' ठरला. -
अभिनेता अभिजीत खांडकेकर
-
सामना संपल्यावरही 'मी पण सचिन'च्या टीमने या मुलांसोबत वेळ घालवला. एकंदरच शिवाजी पार्कच्या मैदानात आज एकदम उत्साहपूर्ण वातावरण होते. या टीमला 'मी पण सचिन च्या टीमतर्फे प्रोत्साहनपर सिझन बॅट भेट म्हणून दिली.
Photo : ‘मी पण सचिन’ म्हणत शिवाजी पार्कात रंगला सेलिब्रिटींचा क्रिकेट सामना
शिवाजी पार्कमध्ये रंगला ‘मी पण सचिन’ सामना
Web Title: Marathi movie me pan sachin team play cricket