‘चला हवा येऊ द्या’ मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या तिच्या आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 'उज्वलतारा' या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी तिने नुकतेच विविध पेहरावात फोटोशूट केले. एक आदिवासी तरूणी, वनकन्या अशा बहुविधरंगी वेशभूषेत श्रेयाने हे फोटोशूट केलं असून तिला या नव्या रुपात ती प्रचंड वेगळी दिसत आहे. श्रेयाने तिचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. श्रेया आपल्या फॅशनसेन्सचे श्रेय आईला देत असून तिच्या आईने फॅशन डिझाईनिंगचे कसलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नाही. तरीदेखील निव्वळ निरीक्षणातून त्या पोषाख डिझाईन करायच्या. श्रेयाला साडीमध्ये वावरायला जास्त आवडतं. -
उज्वलतारामधील हॅण्डलूमची वस्त्रप्रावरणे कोणत्याही स्त्रिचं सौंदर्य खुलवण्यास पुरेसं आहे असं तिला वाटतं.
Photo : श्रेयाचं हटके फोटोशूट पाहिलत का ?
Web Title: Shreya bugade new photoshoot new look