‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री रेशम टिपणीस हे नाव चांगलंच चर्चेत होतं. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रेशमचे अनेक चाहते आहेत. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. 'बिग बॉस'च्या घरात रेशम आणि अभिनेता राजेश श्रृंगारपुरे यांचे सूत जुळल्याचे दिसून आले. मात्र रेशम बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधीपासून एका व्यक्तीला डेट करतेय. -
या व्यक्तीचं नाव संदेश किर्तीकर आहे. रेशमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संदेशसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळतात.
रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासह लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. संसार मोडल्यानंतर ती एक सिंगल मदर होऊन मुलगा मानव आणि मुलगी रिशिका यांचा सांभाळ करत आहे. मात्र घटस्फोट घेण्यापूर्वी विचार केला असता तर चांगले झाले असते. अशी कबुलीही तिने ‘बिग बॉस’च्या सेटवर दिली होती. रेशम आणि संदेश गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
‘बिग बॉस मराठी’ फेम रेशम टिपणीस या व्यक्तीला करतेय डेट
बोल्ड आणि बिनधास्त असलेली रेशम बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधीपासून या व्यक्तीला डेट करतेय.
Web Title: Bigg boss marathi fame resham tipnis dating this person ssv