बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये असंख्य चाहते आहेत. बिग बींना भेटण्यासाठी त्यांचा प्रत्येक चाहता प्रयत्न करत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहू येथे जलसा, प्रतीक्षा आणि जनक हे तीन मोठे आलिशान बंगले आहेत. या तिन्ही बंगल्यांपैकी बिग बींना जलसा हा जास्त जवळचा असून या बंगल्यात त्यांचं संपूर्ण कुटुंब राहतं. बिग बींचा जलसा हा बंगला कोणत्याही राजमहालापेक्षा कमी नाही. प्रशस्त आणि आलिशान असा आहे. अमिताभ यांची स्टडी रूम बिग बींना गाड्यांची प्रचंड आवड असून त्यांचा पार्किंग एरियाही प्रचंड मोठा आहे. या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी पेटिंग्स लावण्यात आले आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मागेदेखील एक मोठं पेटिंग दिसून येत आहे. बिग बींचं बेडरुम -
-
घरातील बाथरुम एखाद्या हॉटेलप्रमाणेच डिझाइन केलं आहे. -
बिग बींच्या जलसामधील लिव्हिंग एरिया या बंगल्यातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा विचारपूर्वक डिझाइन केला आहे. हा बंगला जवळपास १०० कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत. -
-
बंगला नव्हे राजमहाल; पाहा कसा दिसतो बिग बींचा ‘जलसा’
या घरातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे
Web Title: Celebrities amitabh bachchans house jalsa inside beauty photos ssj