-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने एकाच चित्रपटानंतर लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
जॉनी लीव्हरची मुलगी जॅमी ही स्टँडप कॉमेडियन आहे. 'सबसे बडा कलाकार' आणि 'कॉमेडी दंगल' या टीव्ही शोमध्ये ती दिसली होती.
-
आलिया फर्नीचरवाला ही पूजा बेदीची मुलगी आहे. ती 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर. तिने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
मुस्कान जाफरी ही विनोदवीर जयदीप जाफरी यांची मुलगी आहे. ती चित्रपटांनी व्हॉईस ओवर आणि डबिंग करण्याचे काम करते.
-
आलिया कश्यप ही अनुराग कश्यपची मुलगी आहे. तिने माहितीपटामध्ये काम केले आहे.
-
संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर. शनाया, अनन्या पांडे आणि सुहाना खान तिघी खास मैत्रीणी आहेत.
-
अलाना पांडे चंकी पांडेचा भाऊ चिंकी पांडेची मुलगी आहे. ती सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.
-
अभिनेते दीपक तिजोरीची मुलगी समारा लाइमलाईट पासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
अभिनेता मिथून चक्रवर्तीने दत्तक घेतलेली मुलगी दिशानी चक्रवर्ती ही देखील बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सध्या ती अभिनयाचे धडे घेत असून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. तिचे चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने करण जौहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा ही सतत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते.
बॉलिवूड अभिनेत्री पूमन ढिल्लन यांची मुलगी पलोमा ढिल्लनचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. -
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या लोकप्रिय आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान सतत चर्चेत असते.
-
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.
या आहेत बॉलिवूड कलाकारांच्या मुली, सध्याच्या लोकप्रिय स्टारकिड्स
Web Title: Fanous star kids avb