सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली सूद- सोनू सूदने २५ सप्टेंबर १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. सोनालीचा कलाविश्वाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोनू पंजाबी आहे तर सोनाली तेलुगू आहे. -
आशिष विद्यार्थी यांची पत्नी राजोशी विद्यार्थी या बंगाली इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. राजोशी या अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या कन्या आहेत.
सयाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी वंदना शिंदे तेलुगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते साई कुमार आणि त्यांच्या पत्नी सुरेखा कुमार 'गजनी' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रदीप रावत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नीचे नाव कल्याणी रावत आहे. 'बाहुबली' चित्रपटात भल्लालदेवचे वडील बिज्जलदेवची भूमिका साकारणारे नस्सार यांनी निर्माती कमीला यांच्याशी लग्न केलं. कमीला आता राजकारणात सक्रिय असून त्यांना तीन मुलं आहेत. तामिळ चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अरुण विजयने २००६ साली आरती मोहनशी लग्न केलं. अरुणने 'साहो' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' या चित्रपटातील खलनायक तुम्हाला आठवतोय का? अभिनेता मुकेश ऋषी असं त्याचं नाव असून केशनी या त्यांच्या पत्नी आहेत. केशनी यांच्याशी लग्न केल्यानंतर मुकेश यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. राहुल देव हे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. वयाच्या १७व्या वर्षी राहुलने रिनाला डेट केलं होतं. त्यावेळी रिना राहुलपेक्षा वयाने एक वर्ष मोठी होती. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे. मात्र २००९ साली कॅन्सरमुळे रिनाचं निधन झालं.
दक्षिणेतील खलनायकांच्या पत्नींबद्दल तुम्हाला माहित आहे का?
पाहा फोटो
Web Title: South indian villain and their real life wife ssv