• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian tik tok star mppg

टिकटॉकनं केलं सेलिब्रिटी; आता खेळतात कोट्यवधीत

January 20, 2020 16:32 IST
Follow Us
  • अलिकडच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर दिल्यामुळे टिकटॉक या अ‍ॅपचा बराच बोलबाला आहे. काही सेकंदांचे व्हिडीओ या अॅपवर पोस्ट करुन आता सर्वसामान्य कलाकाराही सेलिब्रिटी स्टेटस मिळवताना दिसत आहेत. या फोटो गॅलरीत आपण टीकटॉक अॅपवरुन सेलिब्रिटी झालेले आणि लाखो रुपयांची कमाई करणारे काही कलाकार पाहाणार आहोत.
    1/13

    अलिकडच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर दिल्यामुळे टिकटॉक या अ‍ॅपचा बराच बोलबाला आहे. काही सेकंदांचे व्हिडीओ या अॅपवर पोस्ट करुन आता सर्वसामान्य कलाकाराही सेलिब्रिटी स्टेटस मिळवताना दिसत आहेत. या फोटो गॅलरीत आपण टीकटॉक अॅपवरुन सेलिब्रिटी झालेले आणि लाखो रुपयांची कमाई करणारे काही कलाकार पाहाणार आहोत.

  • 2/13

    रियाज अली ( दोन कोटी ७० लाख रुपये) – भारतामध्ये टिकटॉक स्टारमध्ये रियाज अली या १६ वर्षांच्या मुलाच्या फॉलोअर्सची संख्या आजमितीला ७० लाखांपेक्षा आधिक आहे. टिकटॉकवर त्याच्या प्रोफाईला लाईक करणाऱ्यांची संख्या एक कोटींपेक्षा अधिक आहे. त्याने आतापर्यंत आपल्या प्रोफाईलवर एक हजार १३० व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये रियाजने विविध हिंदी-इंग्रजी गाण्यांवर लिपसिंक, नृत्ये आणि विनोदी व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. तो टिकटॉकवरचा सर्वात विनोदी कलाकार आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याचे कपडे आणि हेअर स्टाईल फॉलोअर्सना खूप आवडते. त्याने नुकताच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करबरोबरदेखील टिकटॉक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 3/13

    अरिष्फा खान (दोन कोटी ५० लाख रुपये) – अरिष्फा खान ही २०१२ पासून बालकलाकार म्हणून सिनेमात काम करते आहे. तिचे युटय़ूब चॅनेल असून त्यावरून ती फॅशन तसेच ब्युटी टिप्स देत असते. तिच्या यूटय़ूब सबस्क्रायबरची संख्या सुमारे नऊ लाखांवर आहे. सोशल मीडियावरील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरिष्फाने टिकटॉकवरदेखील चांगलीच आघाडी घेतली आहे. टिकटॉकवर तिच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटी पाच लाख आहे. तर, तिची प्रोफाईल लाईक्स करणाऱ्यांची सात कोटींपेक्षा जास्त आहे. अरिष्फा खान ही उर्दु शायरी आणि विविध हिंदी गाण्यावर लिपसिंक करते.

  • 4/13

    निशा गुरागेन (दोन कोटी १७ लाख रुपये) – टिकटॉकवर प्रभावी ठरणाऱ्या स्टार्सपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे ती निशा गुरागेन. लिपसिंक आणि अ‍ॅक्टिंगवर जास्त भर देणाऱ्या निशाचे टिकटॉक व्हिडीओ इतर सोशल साईट्सवरदेखील मोठय़ा प्रमाणात व्हायरल होताता. निशाच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटी आहे. तर तिच्या प्रोफाईल लाईक्सची संख्या पाच कोटी इतकी आहे. तिने एकूण एक हजार ३७८ व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये पंजाबी आणि जुन्या गाण्यांवर तिने जास्त व्हिडीओ केलेले आहेत.

  • 5/13

    आवेझ दरबार (दोन कोटी सहा लाख रुपये) – मूळचा नर्तक असलेला आवेझ यूटय़ूब तसंच इन्स्टाग्राम स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहे. आवेझ दरबार नावाच्या त्याच्या यूटय़ूब चॅनेलच्या सबस्क्रायबरचा आकडा २० लाखांपर्यंत गेला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अ‍ॅपवर आवेझ आपल्या नृत्याचे व्हिडीओ अपलोड करतो. आणि आता टिकटॉकवर नृत्याबरोबर लिपसिंग आणि अभिनयाचेही व्हिडीओ अपलोड करतो. आवेझने २२०० व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केलेले आहेत. त्याची स्वतची एक प्रॉडक्शन कंपनी आहे. फॅशन, केसांची स्टाईल आणि नृत्यामुळे त्याला सर्वात जास्त तरुण फॉलोअर्स लाभलेले आहेत. आवेझ दरबारला टिकटॉकवर दोन कोटी सहा लाखांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. आणि सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी आवेझचे टिकटॉक प्रोफाईल लाईक केलेली आहे.

  • 6/13

    जन्नत जुबेर (दोन कोटी) – जन्नत जुबेर ही २००९ पासून सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत आहे. तिने ‘हिचकी’ या चित्रपटात तसेच ‘फुलवा’ या मालिकेत काम केलेले आहे. मात्र, इतर सिनेतारकांच्या तुलनेत टिकटॉकच्या वापरकर्त्यांमध्ये तिचं नाव आघाडीवर आहे. जन्नत जुबेर ही टिकटॉकवर जास्त करून नृत्य आणि लिपसिंकचे व्हिडीओ अपलोड करते. तिचे फॉलअर्स दोन कोटी दोन लाख इतके आहेत. तर, तिचे प्रोफाईल लाईक करणाऱ्यांची संख्या साडेचार कोटीपेक्षा जास्त आहे.

  • 7/13

    सेलिब्रिटींचे टिकटॉक – दीपिका पदुकोन, काजोल, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, जेनेलिया डिझुजा, राजपाल यादव, नेहा कक्कर अशा अनेक सेलिब्रिटींनी या नवीन वर्षी टिकटॉकवर मौज-मजा-मस्ती-धमाल सुरू केली आहे. टिकटॉकसारखा नवा प्लॅटफॉर्म अजमावत चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रितेश आणि जेनेलियाचं शेतातलं नृत्य, घरातल्या लहानग्यांबरोबर केलेली मस्ती, सेटवरील इतर कलाकारांसोबत धिंगाणा, अशा अनेक व्हिडिओंना प्रेक्षकांनी भरभरून लाइक्स दिलेल्या आहेत. तर, ‘छपाक’च्या निमित्ताने लक्ष्मी आगरवालने वेगवेगळ्या गाण्यांवर लिपसिंग आणि डान्स करत लाखोंचा चाहतावर्ग आपल्याकडे खेचला आहे. तिच्याबरोबर दीपिका पदुकोननेही टिकटॉकवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करत दीपिका टिकटॉकवर चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडत आहे. काजोलनेही ‘तान्हाजी’च्या निमित्ताने टिकटॉक आपलंसं केलं आहे. अनुपम खेर आणि राजपाल यादव यांनी टिकटॉकच्या प्रेक्षकांना हसवण्याचा विडाच उचलला असावा. शिल्पा शेट्टीचे लंडनमधील, सेटवरील किंवा घरातील वेगवेगळे व्हिडीओ लोकांच्या पंसतीस उतरत आहेत.

  • 8/13

  • 9/13

  • 10/13

    अपडेटेड टिकटॉक – टिकटॉक येण्यापूर्वी सोशल मीडियावर यूटय़ूब हा पर्याय होता. त्यावर व्हिडीओ एडिटींग, व्हिडीओ अपलोड करता येत होते. मात्र, त्यासाठी बऱ्याच किचकट गोष्टी कराव्या लागत असत. आजही बऱ्याच लोकांना आपले यूटय़ूब चॅनेल काढता येते, त्यावर शूट करून व्हिडीओ अपलोड करता येतात, हे माहीतच नाही.

  • 11/13

  • 12/13

    कारण, प्रत्येक अ‍ॅपमध्ये काही मर्यादा होत्या. टिकटॉक प्रत्येकवेळी स्वतला अपडेट करत गेले. त्यामुळे सध्याच्या टिकटॉक अ‍ॅपवर वरील सर्व अ‍ॅप्समधील फिचर्स उपलब्ध झाले.

  • 13/13

    सहाजिकच, इतके फिचर्स असणारे आणि हाताळायलाही सहज सोपे असणारे टिकटॉक तरूणांनी डोक्यावर उचलून धरले. टिकटॉकमधून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला घरबसल्या व्यक्त व्हायची संधी मिळाली, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले.

Web Title: Indian tik tok star mppg

IndianExpress
  • Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch LIVE: Shubhanshu Shukla enters ISS as hatch opens, first remarks soon
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Disclose all social media handles used in 5 years or risk visa ban, says US embassy in India
  • After Shashi Tharoor’s ‘don’t ask permission to fly’ post, Congress MP warns of ‘predatory birds’ on the hunt
  • Jasprit Bumrah likely to miss second Test against England; India look for replacement, new plan
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.