अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. नोराचे अरब कुटुंबातील असून तिचे कुटुंबीय जुन्या विचारसरणीचे आहेत. डान्सविषयी फार आवड असल्याने ती लपूनछपून डान्सचे व्हिडीओ पाहून प्रॅक्टिस करायची. सुरुवातीला लोकांसमोर डान्स करायला ती फार घाबरायची. तिच्या डान्स करण्यावरून शाळेत अनेकांनी टीका केल्याने ती खुलेपणाने नृत्यकौशल्य दाखवू शकत नव्हती. कॅनडामधून भारतात आल्यानंतर ती येथे आठ मुलींसोबत एका घरात राहायची. तिच्या रुममेट्सनी तिचा पासपोर्ट चोरी केला होता आणि पैशांअभावी तिला भारत सोडून पुन्हा कॅनडाला जावे लागले होते. हिंदी भाषा फारशी येत असल्याने ऑडिशन देणंही तिला कठीण जात होतं. अनेकांचा अपमान सहन करून करिअरमध्ये पुढे आल्याचं नोरा सांगते. २०१४ मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती प्रकाशझोतात आली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले. अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली. करिअरच्या सुरुवातीला याच बेली डान्समुळे कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचं ती अभिमानानं सांगते. ‘दिलबर’ या मूळ गाण्यात अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घायाळ अदांनी चाहत्यांना भुरळ घातली होती. त्यानंतर रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये नोराच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
गरीब कुटुंबातून आलेली नोरा आता झाली बॉलिवूडची ‘बेली डान्स क्वीन’
कॅनडामधून भारतात आल्यानंतर ती येथे आठ मुलींसोबत एका घरात राहायची.
Web Title: Nora fatehi birthday special scorching hot photos of the baahubali bombshell ssv