-
भाग्यश्री कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी सांगलीच्या पटवर्धन या मराठी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला. ( सर्व फोटो सौजन्य – भाग्यश्री इन्स्टाग्राम)
-
भाग्यश्रीला दोन बहिणी आहेत. मधुवंती आणि पूर्णिमा अशी तिच्या बहिणींची नावे आहेत.
-
अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर भाग्यश्रीचे शेजारी होते. त्यांनी तिला एका मालिकेत काम करण्यासाठी राजी केले.
-
एक-दोन मालिकांमध्ये काम केल्यानंतर भाग्यश्रीला १९८९ साली राजश्री प्रोडक्शनच्या 'मेने प्यार किया' चित्रपटात सलमान खान बरोबर मोठा ब्रेक मिळाला.
-
'मेने प्यार किया' हा करीयरमधील भाग्यश्रीचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे.
-
'मेने प्यार किया' साठी भाग्यश्रीला बेस्ट फिमेल डेब्युचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
-
अभिनयाकडून उद्योजक बनलेल्या हिमालया दासानी बरोबर भाग्यश्रीने १९९० साली लग्न केले.
-
कैद मे है बुलबुल, त्यागी आणि पायल या तीन चित्रपटात भाग्यश्रीने काम केले. हे तिन्ही चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाले.
-
भाग्यश्री राजघराण्याशी संबंधित आहे. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन सांगलीचे राजे आहेत.
-
बॉलिवूड शिवाय भाग्यश्रीने तामिळ, तेलगु, कन्नड, मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
भाग्यश्रीला अभिमन्यू आणि अवंतिका अशी दोन मुले आहेत. तिने मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.
-
भाग्यश्रीच्या मुलाने अभिमन्यूने 'मर्द को दर्द नही होता' या कॉमेडी सिनेमातून डेब्यू केला आहे.
-
भाग्यश्री हे नाव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे ते 'मेने प्यार किया' चित्रपटासाठी. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता.
-
२००१ साली हॅलो गर्ल्समधून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. जननी, हमको दिवाना कर गये या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
भाग्यश्री आजही फिटनेसला तितकच महत्व देते. एकही दिवस न चुकवता नित्यनियमाने तिचा व्यायाम सुरु असतो. हेच भाग्यश्रीच्या फिटनेसचे रहस्य आहे.
PHOTOS: वयाच्या ५१ व्या वर्षीही भाग्यश्री सौंदर्य आणि फिटनेस कसा टिकवला?
Web Title: Bhagyshree patwardhan bollywood actress dmp