झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्रीनंतर मालिकेने वेगळंच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला गेलेल्या अपूर्वाने तिने परिधान केलेल्या साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले. पीच कलरच्या साडीमध्ये अपूर्वा खूपच लाजवाब दिसतेय. तिच्या या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शेवंता जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यातदेखील ती मादक आहे. शेवंताची व्यतिरेखा साकारल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
‘शेवंता’च्या नव्या लूकवर नेटकरी फिदा
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे.
Web Title: Ratris khel chale 2 fame shevanta aka apurva nemlekar new look got netizens attention ssv