Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress pooja bedi shares jammu kashmir former cm omar abdulla photo twitter old memories jud

ओमर अब्दुलांचा फोटो शेअर करत पूजा बेदी म्हणाली…

March 14, 2020 13:29 IST
Follow Us
  • बॉलिवूडची अभिनेत्री पूजा बेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजा बेदी ही सध्या मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
    1/12

    बॉलिवूडची अभिनेत्री पूजा बेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजा बेदी ही सध्या मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

  • 2/12

    ती अनेक व्हिडीओस आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिनं नुकताच जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • 3/12

    त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पूजा बेदीनं ओमर अब्दुल्ला यांच्यासोबतचा आपला जुना फोटो शेअर केला. तसंच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • 4/12

    नुकताच ओमर अब्दुल्ला यांचा ५० वा वाढदिवस झाला.

  • 5/12

    बालणीच्या मित्रा तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तथ्यहीन आरोप आणि न्यायालयाच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे आपला वेळ नजरकैदेत घालवावा लागत आहे यावर विश्वासही बसत नाही. तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवणं आणि आपली बाजू देखील मांडू न देणं हा अन्याय आहे, असं ती म्हणाली होती.

  • 6/12

    जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

  • 7/12

    यापूर्वीही ती ओमर अब्दुल्ला यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती. तिनं त्यांची सुटका करण्याची मागणी सरकारकडे केली होती.

  • 8/12

    ओमर अब्दुल्ला यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून कैदेत ठेवण्यात आले आहे. ते माझे वर्गमित्र आहेत तसेच तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबियांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या सुटकेचा विचार करावा, असं ती म्हणाली होती.

  • 9/12

    हे तर स्पष्ट आहे की कायमस्वरुपी त्यांना कैदेत ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल, असंही ती म्हणाली होती.

  • 10/12

    पूजा बेदी ही बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार कबीर बेदी यांची कन्या आहे. ती झलक दिखला जा, नच बलिये आणि बिग बॉससारख्या शोमध्येही झळकली होती.

  • 11/12

    पूजा बेदीनं यापूर्वी कंडोमच्या जाहिरातींवरून सरकारवर टीका केली होती. सरकारनं या जाहिरातांनवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता.

  • 12/12

    विषकन्या, जो जीता वही सिकंदर, लुटेरे आणि शक्ती हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

Web Title: Actress pooja bedi shares jammu kashmir former cm omar abdulla photo twitter old memories jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.