• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about bollywood actress shefali shah dmp

PHOTOS: भिकू म्हात्रेची पत्नी ते डीसीपी वर्तिका चतुर्वेदी जाणून घ्या टॅलेंटेड शेफाली शाहबद्दल…

April 17, 2020 17:15 IST
Follow Us
  • राम गोपाल वर्माच्या 'रंगीला'मध्ये छोटीशी भूमिका साकारणाऱ्या शेफाली शाहने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य - शेफाली शाह इन्स्टाग्राम)
    1/10

    राम गोपाल वर्माच्या 'रंगीला'मध्ये छोटीशी भूमिका साकारणाऱ्या शेफाली शाहने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य – शेफाली शाह इन्स्टाग्राम)

  • 2/10

    राम गोपाल वर्माच्याच 'सत्या' चित्रपटातच शेफाली शाहने गॅँगस्टर भिकू म्हात्रेच्या पत्नीची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या रोलसाठी तिला फिल्मफेअरचा समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • 3/10

    २००५ साली आलेल्या 'वक्त द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासमोर शेफालीने कसदार अभिनयाचे दर्शन घडवले. या रोलसाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

  • 4/10

    १९७२ साली मुंबईमध्ये शेफालीचा जन्म झाला. सुधाकर आणि शोभा शेट्टी यांची ती एकुलती एक मुलगी आहे. वडिल आरबीआयमध्ये नोकरीला तर आई होमियोपथीची डॉक्टर होती.

  • 5/10

    सांताक्रूझच्या आरबीआय वसाहतीमध्ये शेफालीचे बालपण गेले.

  • 6/10

    बॉलिवूडमध्ये करीयर सुरु करण्यापूर्वी शेफाली शाहने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

  • 7/10

    चित्रपटच नाही अनेक हिंदी मालिकांमध्येही शेफाली शाहने काम केले आहे. हसरतेमधील सावीच्या भूमिकेला तिने आपल्या अभिनयाने एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले.

  • 8/10

    शेफालीने हसरतेमधील सहकलाकार हर्ष छाया बरोबर लग्न केले होते. पण मतभेद झाल्यामुळे काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

  • 9/10

    त्यानंतर शेफालीने निर्माता, दिग्दर्शक विपुल शाहबरोबर लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत.

  • 10/10

    मागच्यावर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या दिल्ली क्राइम या वेबसीरिजमध्ये तिने वर्तिका चतुर्वेदी या जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

Web Title: Know about bollywood actress shefali shah dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.