-
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यामुळे त्यांना बॉलिवूड पासून लांब जावे लागले. तसेच अनेक अभिनेत्रींनी स्वत:ला लाईमलाईटपासून लांब देखील ठेवले आहे. या यादी मधील एक अभिनेत्री म्हणजे ट्युलिप जोशी. तिने फिल्मी करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे बॉलिवूड पासून लांब जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. पण ती आज ६०० कोटींची मालकिण असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. चला जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…
-
ट्युलिप ही मुंबईची आहे. तिचे बालपण तसेच शिक्षणही मुंबईत झाले आहे.
-
२००० साली तिने फेमिना मिस इंडियामध्ये सहभाग घेतला होता.
-
त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
-
२००२ मध्ये तिने यश राज फिल्मसच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिची भूमिका चर्चेत होती.
-
त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी ट्युलिपला तिचे नाव बदलण्याचा सल्ला दिला. ती बॉलिवूडमध्ये संजना या नावाने ओळखली जाऊ लागली.
-
२००३ मध्ये तिने तेलुगू चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटाचे नाव 'विलन' असे होते.
-
त्यानंतर २००४मध्ये ट्युलिपने दिल मांगे मोर या चित्रपटात भूमिका साकारली.
-
ट्युलिपने 'मातृभूमी' य़ा बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिचे कौतुक करण्यात आले होते.
-
२००७मध्ये ट्युलिपने मल्याळम इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. पण तिला तेथेही फारशी लोकप्रियता मिळाली नाही.
-
दरम्यान ट्युलिपचे कॅप्टन विनोद नायर यांच्यावर प्रेम जडले. ती जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती.
-
विनोद हे एक यशस्वी बिझनेसमॅन आहेत.
-
आता ट्युलिप नवऱ्यासोबत बिझनेस करत असल्याचे म्हटले जाते.
-
-
ती विनोद यांचा ६०० कोटींचा बिझनेस सांभाळत असून कंपनीची डायरेक्टर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये अपयशी ठरुनही ही अभिनेत्री आहे ६०० कोटींची मालकीण?
जाणून घ्या सविस्तर..
Web Title: Remember tulip joshi heres what the actress is up to these days avb