प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा खलनायक आणि ‘सेलिब्रिटी संन्यासी’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. हॅण्डसम हंक’, ‘डॅशिंग अभिनेता’ म्हणूनदेखील त्यांनी तरुणींच्या मनावर राज्य केलं. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९९० साली विनोद खन्ना यांनी कविता लालचंद हिराचंद यांच्याशी लग्न केलं. कविता या विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. विनोद खन्ना, त्यांची पत्नी कविता खन्ना, मुलगा साक्षी खन्ना आणि मुलगी श्रद्धा खन्ना. विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षीदेखील त्यांच्याप्रमाणे कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. (एक्स्प्रेस आर्काइव्ह फोटो) गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत विनोद खन्नांचा मस्ताना अंदाज विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यापैकीच काही चित्रपट म्हणजे, 'हेराफेरी' (१९७६), 'खून पसिना' (१९७७), 'अमर अकबर अँथनी' (१९७७), 'परवरिश' (१९७७) आणि 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८) १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा 'अमर, अकबर, अँथनी' हा चित्रपट कोणीच विसरू शकत नाही. धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्न, डॅनी डेन्झोप्पा १९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रिय झाले. भाजपाचे पंजाबमधील गुरुदासपुर खासदार म्हणूनही ते निवडून आले होते. -
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि विनोद खन्ना.
-
या फोटोवरुन विनोद खन्ना यांची नम्रता दिसून येते.
Photo : बॉलिवूडच्या ‘अमर’चा डॅशिंग अंदाज
Web Title: Actor vinod khanna photo gallery old and latest pics ssj 93