-
करोना संकटात अनेक सेलिब्रेटींनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
कोणताही गाजावाजा न करता निती टेलरचा विवाहसोहळा पार पडला.
-
निती टेलरने इन्स्ट्राग्रामवर आपलं लग्न झाल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
-
दोन महिन्यांनी निती टेलरने आपलं लग्न झाल्याची माहिती जाहीर केली आहे.
-
-
परिक्षितसोबत निती टेलरने सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
-
या लग्नामध्ये कुटुंबीय आणि काही मोजके मित्रमंडळी उपस्थित होते.
-
नितीने आपण इतके दिवस लग्न झाल्याची बातमी का लपवून ठेवली याचा खुलासाही केला आहे.
-
तिने म्हटलं आहे की, "करोना संकट लवकर संपेल आणि आम्ही मोठं सेलिब्रेशन करु अशी अशा होती. त्यामुळेच मी इतक्या उशिरा हे जाहीर करत आहे. आता २०२१ ची सुरुवात चांगली होईल अशी अपेक्षा आहे".
-
आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, "मिस ते मिसेसपर्यंतचा माझा प्रवास पूर्ण झाला आहे. मी १३ ऑगस्ट २०२० रोजी परिक्षितसोबत विवाहबंधनात अडकली आहे. खूप छोटं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आमचा विवाहसोहळा पार पडला"
-
निती टेलरने लग्नासाठी गुलाबी एम्ब्रॉयडरी असणारा लेहंगा घातला होता.
-
पायल केयालने हा लेहंगा डिझाऊन केला होता.
-
याआधी पायलने इन्स्ट्राग्रामला नववधूच्या वेषातील फोटो शेअर केले होते.
-
पण त्यावेळी तिने आपल्या लग्नाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं.
-
निती टेलर एमटीव्हीवरील कैसी ये यारियाँ, इशकबाज, बडे अच्छे लगते है, सावधान इंडिया आणि ये है आशिकी अशा अनेक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.
‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, समोर आले फोटो
कोणताही गाजावाजा न करता निती टेलरचा विवाहसोहळा पार पडला
Web Title: Tv actress niti taylor reveals she is married with fiance parikshit bawa sgy