लॉकडाउनदरम्यान अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. आज, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत विवाहबंधनात अडकली आहे. तेजस देसाईसोबत शर्मिष्ठानं सात फेरे घेतले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत शर्मिष्ठा आणि तेजस यांनी महत्त्वाचे आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शर्मिष्ठा आणि तेजस यांनी लग्नासाठी पेशवाई थीम निवडली होती. लग्नातील दोघांचाही पेशवाई पेहराव लक्ष वेधून घेत होता. शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा जून महिन्यात लॉकडाउनजदरम्यान इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला होता. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी कुटुंबिय आणि काही मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी व ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे शर्मिष्ठा राऊत चर्चेत आली होती. शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये शर्मिष्ठा झळकली असून तिची लोकप्रियता प्रचंड असल्याचं पाहायला मिळतं. शर्मिष्ठानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असून बिग बॉसमुळं ती चर्चेत आली होती. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिनं काम केलं आहे. 'जो भी होगा देखा जयेगा', 'टॉम अँड जेरी', 'बायको असून शेजारी', 'शंभू राजे' या नाटकात शर्मिष्ठानं काम केलं आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे. सोशल मीडियावर शर्मिष्ठा अॅक्टिव असते. आपल्या चाहत्यांसोबत ती फोटो पोस्ट करत असते. -
फोटो सौजन्य – शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या इन्स्टाग्रामहून
जुळून आल्या रेशीमगाठी! ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात
लग्नासाठी पेशवाई थीम होती
Web Title: Marathi actress sharmishtha raut tied knot with tejas desai nck