बॉलिवूडमध्ये एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली मल्लिका शेरावत गेल्या काही काळापासून कलाविश्वापासून लांब आहे. मात्र तिच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगतात. बोल्ड आणि किसिंग सीनमुळे चर्चेत आलेल्या मल्लिकाविषयीच्या अनेक गोष्टी चाहत्यांना माहित नाही. त्यातच कलाविश्वामध्ये येण्यापूर्वी तिचं लग्नही झालं होतं ही गोष्टदेखील अनेकांना माहित नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले त्यानंतर तिचं लग्न झाल्याचं समोर आलं. परंतु मल्लिकाचा संसार फार काळ टिकला नाही. अल्पावधीतचं ती विभक्त झाली. २४ ऑक्टोबर १९७६ मध्ये मल्लिकाचा हरियाणातील एका गावी जन्म झाला. मल्लिकाचं खरं नाव रिमा लांबा असं असून कलाविश्वामध्ये ती मल्लिका शेरावत या नावाने पुढे आली. मल्लिका कलाविश्वामध्ये येण्यापूर्वी एअर हॉस्टेस होती. काही वर्ष एअर हॉस्टेस म्हणून काम करत असताना तिची ओळख वैमानिक करण सिंह गिल याच्यासोबत झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. काही क्षुल्लक कारणांवरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. करण सिंह गिल सोबतच्या नात्याला काडीमोड देऊन तिने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मल्लिकाने मर्डर, ख्वाहिश, अनफेथफुल,हिस्स, डर्टी पोलिटिक्स, तेज, वेलकम सारखे चित्रपट करुन स्वत:चं स्थान निर्माण केलं. मात्र काही ठराविक चित्रपट केल्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचं झालं होतं लग्न, ‘या’ कारणामुळे घेतला घटस्फोट
Web Title: Mallika sheravat personal life wedding and divorce ssv