Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from anushka kareena to amrita rao bollywood actresses did not hide their baby bump ssj

बेबीबंपसोबत हटके फोटोशूट; ‘या’ अभिनेत्रींची झाली सर्वाधिक चर्चा

Updated: September 9, 2021 18:39 IST
Follow Us
    • बॉलिवूड असो किंवा क्रीडाविश्व अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या प्रेग्नेंसीविषयी खुलेपणाने चर्चा करतात. यात अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्री या त्यांच्या खास बेबीबंपसोबत केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. ( सौजन्य : अभिनेत्रींच्या इन्स्टाग्राम पेजवरुन)
    • बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीनाला तैमूर हा लहान मुलगा असून सध्या तो लोकप्रिय स्टारकिड म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे तैमूरच्या जन्मापूर्वी करीना तिच्या खास बेबीबंपच्या फोटोमुळे चर्चेत आली होती. तिने कधीच तिच्या प्रेग्नंसीची गोष्ट लपवली नसल्याचं पाहायला मिळालं.
    • त्यातच आता करीना दुसऱ्यांदा आई होणार असून तिने अलिकडेच तिची ही गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
    • अभिनेत्री सोहा अली खान हिच्या बेबीबंप फोटोशूटची देखील प्रचंड चर्चा रंगली होती. सोहाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. यात तिचा योग करतानाचा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता.
    • सोहाने २०१५ मध्ये अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केलं असून तिने २०१७ मध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव इनाया असून तीदेखील लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे.
    • २०१६मध्ये व्यावसायिक डिनो ललवानीसोबत लग्नगाठ बांधणारी अभिनेत्री म्हणजे लीजा हेडन. आई होणार असल्याची चाहुल लागल्यानंतर लीजाने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.
    • लीजाने बिकिनीमध्ये फोटो शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं होतं. तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले होते.
    • अभिनेत्रींच्या बेबीबंप फोटोशूटमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलेली ती समीरा रेड्डीच्या फोटोशूटची. समीराने अंडरवॉटर फोटोशूट केलं होतं.
    • या फोटोच्या माध्यमातून आई होताना एका स्त्रीला किती त्रास, कष्ट सहन करावे लागतात हे तिने सांगण्याच्या प्रयत्न केला होता. समीराला एक मुलगा आणि मुलगी असल्याचं सांगण्यात येतं.
    • अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे सध्या हे दोघंही प्रचंड आनंदात असल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
    • अलिकडेच अनुष्काने एक फोटोशूट केलं असून त्यात तिचं बेबीबंप दिसून येत आहे.
    • विवाहफेम अभिनेत्री अमृता राव लवकरच आई होणार आहे. मात्र, अमृताने ही गोष्ट उघडपणे सांगितली नव्हती. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तिने ही गुडन्यूज शेअर केली.
    • अमृताला सध्या नववा महिना सुरु असून लवकरच ती आई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: From anushka kareena to amrita rao bollywood actresses did not hide their baby bump ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.