Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. interesting facts about actress tabu dmp

तब्बूच्या नावामागे आहे देव आनंद यांचं खास कनेक्शन; जाणून घ्या..

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • चार नोव्हेंबर १९७१ रोजी तबस्सुम फातिमा हाशमीचा जन्म झाला. भारतीय चित्रपट सृष्टीत तबस्सुम आज तब्बू म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदीच्या बरोबरीने इंग्रजी, तामिळ, तेलगु, मल्याळम, मराठी आणि बंगाली भाषेच्या चित्रपटातही तब्बूने काम केले आहे. ( सर्व फोटो सौजन्य - तब्बू इन्स्टाग्राम)
    1/10

    चार नोव्हेंबर १९७१ रोजी तबस्सुम फातिमा हाशमीचा जन्म झाला. भारतीय चित्रपट सृष्टीत तबस्सुम आज तब्बू म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदीच्या बरोबरीने इंग्रजी, तामिळ, तेलगु, मल्याळम, मराठी आणि बंगाली भाषेच्या चित्रपटातही तब्बूने काम केले आहे. ( सर्व फोटो सौजन्य – तब्बू इन्स्टाग्राम)

  • 2/10

    पेहला पेहला प्यार हा हिंदीमधला तब्बूचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. १९९४ साली हा चित्रपट रिलीज झाला. पण हा चित्रपट कधी आला, कधी गेला कळलंच नाही.

  • 3/10

    १९९४ सालीच विजयपथ हा तब्बूचा सिनेमा हिट ठरला. अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.

  • 4/10

    हैदराबाद मधल्या एका मुस्लिम कुटुंबात जमाल हाशमी आणि रिझवाना यांच्यापोटी तब्बूचा जन्म झाला. शबाना आझमी ही जमाल हाशमी यांची बहिण आहे. त्यामुळे तब्बू शबाना आझमी यांची भाची आहे.

  • 5/10

    हैदराबादमधल्या कॉन्वेंट शाळेत तब्बूचे शिक्षण झाले. ती १९८३ साली मुंबईत आली. मुंबईतल्या कॉलेजमध्ये तिने दोन वर्ष शिक्षण घेतले. ती लहान असतानाच आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तिची आई शाळेत शिक्षिका होती.

  • 6/10

    डिसेंबर १९८७ मध्ये बोनी कपूर यांनी दोन मोठया चित्रपटांची घोषणा केली. 'रुप की रानी चोरो का राजा' आणि 'प्रेम' असे ते दोन चित्रपट होते. तब्बूला प्रेम चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आले. संजय कपूर यामध्ये नायक होता.

  • 7/10

    'प्रेम' चित्रपटाची घोषणा १९८७ साली झाली असली तरी हा चित्रपट बनायला आठ वर्ष लागली. बोनी कपूरच्या करीअरमधला हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता. पण त्यानंतरही तब्बूला चांगले चित्रपट आणि यश मिळालं.

  • 8/10

    १९८५ साली देव आनंद यांच्या 'हम नौजवान' चित्रपटातून तब्बूने बाल कलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी देव आनंद यांनी तब्बूसमला 'तब्बू' हे नाव दिले. तब्बू हे नाव खूप सुंदर आहे असे देवा आनंद यांना वाटले.

  • 9/10

    पुढे इंडस्ट्रीमध्ये तब्बूसम तब्बू म्हणूनच ओळखली जाऊ लागली. तिचे नाव तब्बूसम आहे, हे फार कमी जणांना माहित असेल. शिक्षक आणि शाळेतील मैत्रिणी सोडल्यास कोणीही तब्बूला तब्बूसम म्हणून बोलवत नाही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बू मुंबईत आली.

  • 10/10

    १९९६ साली तब्बूचे एक आठ चित्रपट रिलीज झाले. त्यात साजन चले ससूराल आणि जीत हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले.

Web Title: Interesting facts about actress tabu dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.