• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress who gets pregnant during lockdown sgy

शेवटी आई तू होणार ग!…लॉकडाउनमध्ये या अभिनेत्रींनी दिली ‘गुड न्यूज’

अभिनेत्रींनी लॉकडाउनच्या काळात गुड न्यूज दिली आहे

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • लॉकडाउनचा काळ अनेकांसाठी अवघड होता. मात्र काही सेलिब्रेटींसाठी हा लॉकडाउनचा आयुष्याची नवी इनिंग सुरु करणारा ठरला आहे. अनेक अभिनेत्रींनी लॉकडाउनच्या काळात गुड न्यूज दिली आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)
    1/25

    लॉकडाउनचा काळ अनेकांसाठी अवघड होता. मात्र काही सेलिब्रेटींसाठी हा लॉकडाउनचा आयुष्याची नवी इनिंग सुरु करणारा ठरला आहे. अनेक अभिनेत्रींनी लॉकडाउनच्या काळात गुड न्यूज दिली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 2/25

    या यादीत सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे अनुष्का शर्माचं. अभिनेत्री अनुष्का शर्मा चार महिन्यांची गर्भवती असून विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लवकरच दोघांचे तीन होणार असल्याचं जाहीर केलं होतं.

  • 3/25

    विराट आणि अनुष्काला दोघांचे तीन होण्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

  • 4/25

    २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीत लग्न केलं होतं.

  • 5/25

    विराट कोहली आयीपएलनिमित्त दुबईत असतानाही अनुष्का त्याच्यासोबत तिथे उपस्थित असून अनेक सामन्यांना हजेरी लावली. विराट मैदानात असतानाही अनुष्काला 'जेवलीस का' विचारतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता.

  • 6/25

    करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार असून लवकरच तैमूरला मोठा भाऊ मिळणार आहे. तैमूरमुळे करिना आणि सैफ नेहमीच प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर चर्चेत असततात. करिना ३९ वर्षांची असून सैफचं वय ५० आहे.

  • 7/25

    १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ आणि करिनाने लग्न केलं होतं. २० डिसेंबर २०१६ मध्ये तैमूरचा जन्म झाला.

  • 8/25

    लॉकडाउनमध्येच करिनाने आपण गर्भवती असल्याची बातमी दिली.

  • 9/25

    अभिनेत्री लग्न आणि मुलं झाल्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर जातात. मात्र करिनाने हा ट्रेंड मोडला आहे. त्यातच करिना दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • 10/25

    दुसरीकडे सैफने वडील होण्यासाठी हेच योग्य वय असल्याचं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. सैफ अली खान चौथ्यांदा वडील होणार आहे.

  • 11/25

    तर करिनाने गर्भवती असतानाही आमीर खानसोबत 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

  • 12/25

    'इश्क विश्क' चित्रपटासोबत अनेक तरुणांच्या मनात घर करणारी अमृता रावनेही लॉकडानमध्ये गुड न्यूज दिली आहे.

  • 13/25

    काही दिवसांपूर्वी अमृता रावला आपला पतीन अनमोलसोबत हॉस्पिटलबाहेर पाहण्यात आलं होतं. यावेळी तिचं बेबी बम्प दिसत होतं.

  • 14/25

    नंतर अमृता रावने लाल साडीमधील आपला एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

  • 15/25

    टीव्ही अभिनेत्री अनिता हस्सनंदनीने आपण लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनिताने आपल्या आयुष्यातील ही गोड बातमी शेअऱ केली.

  • 16/25

    पण महत्त्वाचं म्हणजे हे जाहीर करण्याच्या आधीपासून अनिता प्रेग्नंट आहे. पण ही बातमी तिने आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती.

  • 17/25

    अनिताने इन्स्टाग्रामला फोटो शेअर केले असून कशा पद्धतीने चार वेळा आपण आपला बेबी बंप लपवला हे दाखवलं आहे. अनिताने एकूण चार फोटो शेअर केले असून यामध्ये तिने कपडे अशा पद्दतीने परिधान केले आहेत की ती प्रेग्नंट आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही.

  • 18/25

    "चार वेळा मी बेबी बंप लपवण्यात यशस्वी झाले. थोडक्यात तुम्हा सर्वांना फसवलं," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 19/25

    यामध्ये मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरचाही समावेश आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

  • 20/25

    धनश्री आई होणार असून सोशल मीडियावर नुकतीच तिने ही गुड न्यूज दिली. तिने बेबी बंपसह फोटोशूट केलं असून त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 21/25

    आई होणार असल्याने धनश्रीने सध्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे.

  • 22/25

    धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. ‘माझिया प्रियाला..’ मध्ये तिने अगदी खलनायिकी अशी नाही पण तशीच काहीशी छटा असणारी भूमिका साकारली होती. तर ‘गंध फुलांचा…’ मालिकेत ती अगदी सोज्ज्वळ भूमिकेत होती.

  • 23/25

    'देवो के देव महादेव' फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या घरी नवा पाहुणा आला आहे.

  • 24/25

    लॉकडाउनमुळे पूजाला कुटुंबीयांशिवायच कुणाल वर्मासोबत लग्न करावं लागलं होतं. त्यानंतर लगेचच तिने आपण गर्भवती असल्याची माहिती दिली.

  • 25/25

    लवकरच आपण पारंपारिक पद्धतीने कुणालसोबत लग्न करणार असल्याची माहिती पूजाने दिली आहे. यामध्ये तिची आई आणि जवळचे नातेवाईक सहभागी होतील.

Web Title: Actress who gets pregnant during lockdown sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.