-
करोना विषाणूचं संक्रमण अद्याप थांबलेलं नाही. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील करोनाची लागण झाली होती. तिने योग्य उपचार घेऊन यशस्वीरित्या करोनावर मात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करोनाची लागण झाल्यानंतर आलेला अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे ऐकून मी खूप घाबरले होते. कारण त्यावेळी करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. परिणामी मला देखील मृत्यूची सतावत होती. परंतु डॉक्टरांनी माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी योग्य उपचार करुन मला बरं केलं." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तमन्ना पूर्वी तिच्या आई-वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. तिचं संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे अवघे ३ हजार ९५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात ६ हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९१.५३ इतका झाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राज्यात आज १५० करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ७८ हजार ५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १४ हजार २७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्रात सध्या १० लाख ७१ हजार १६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ९ हजार ७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
‘त्या वेळी सतावत होती मृत्यूची भीती’; तमन्नाने सांगितला करोनाचा अनुभव
Web Title: Tamannaah bhatia about coronavirus disease mppg