• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 5 years of tamasha deepika padukone shares unseen bts photos with ranbir kapoor ssj

दीपिका-रणबीरच्या फोटोचा ‘तमाशा’; शेअर केले एक्स बॉयफ्रेंडचे फोटो

दीपिकाने शेअर केले रणबीरसोबतचे अनसीन फोटो

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
    • बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. ( सौजन्य : दीपिका पदुकोण इन्स्टाग्राम पेज)
    • खरं तर दीपिका आणि रणबीर यांचा ब्रेकअप होऊन बराच काळ उलटला आहे. हे दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढे मार्गस्थदेखील झाले आहेत. मात्र, आजही त्यांच्या नात्याविषयी रोज चर्चा रंगताना दिसतात.
    • दीपिका-रणबीरचा ब्रेकअप जरी झाला असला तरीदेखील हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा दीपिका रणबीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
    • अलिकडेच दीपिकाने रणबीरसोबतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
    • दीपिकाने शेअर केलेले फोटो पाहून अनेक जण थक्क झाले असून हे फोटो यापूर्वी दीपिका किंवा रणबीरने कधीच शेअर केले नव्हते.
    • इम्तियाज अली यांचा तमाशा हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात दीपिका-रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर केली होती.
    • नुकतेच या चित्रपटाला ५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दीपिकाने रणबीरसोबतचे सेटवरील बिहाइंड द सीनचे फोटो शेअर केले आहेत.
    • या फोटोमध्ये दीपिका-रणबीरच्या काही सीनचं चित्रीकरण होताना दिसत आहे.
    • हे फोटो शेअर करत दीपिकाने केवळ #5YearsOfTamasha, #5YearsofTara #RanbirKapoor इतकीच कॅप्शन दिली आहे.
    • दीपिका आणि रणबीर या दोघांनी 'ये जवानी है दीवानी', 'बचना ए हसीनो', 'तमाशा' अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
    • दीपिका आणि रणबीर यांचं अफेअर कलाविश्वात प्रचंड गाजलं होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला.
    • दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगबरोबर लग्नगाठ बांधली आहे. तर रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे.
    • दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटात व्यस्त असून ती लवकरच दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या चित्रपटात झळकणार आहे. तसंच तिने दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतदेखील एक चित्रपट साइन केला आहे. इतकंच नाही तर '83' या चित्रपटातही ती झळकणार आहे.

Web Title: 5 years of tamasha deepika padukone shares unseen bts photos with ranbir kapoor ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.