'द कपिल शर्मा शो'मध्ये अभिनेत्री अर्चना पुरण सिंहने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. नवविवाहित दाम्पत्य नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंह यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. तेव्हा अर्चनाने तिच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. अर्चनाने सांगितलं की अभिनेत्री असल्याने परमीतच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. काहीही झालं तरी अर्चनाशीच लग्न करण्यावर परमीत ठाम होता. आईवडिलांच्या विरोधात जाऊन अर्चनाशी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्चना व परमीतने कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केलं. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी अर्चना ही सैफ अली खानच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. शूटिंगमधून वेळ काढून तिने परमीतशी लग्न केलं आणि त्याची कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. लग्नानंतरही चार वर्षांपर्यंत त्यांनी कोणालाच काहीच सांगितलं नव्हतं. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने लग्न केल्याचं लपवणं सोपं गेल्याचं अर्चनाने सांगितलं. १९९५ मध्ये 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या चित्रपटातून परमीत प्रकाशझोतात येण्यापूर्वी अर्चना आणि परमीतने १९९२ मध्ये लग्न केलं.
परमीत सेठीशी लग्नाबाबत अर्चना पुरण सिंहने केला मोठा खुलासा
Web Title: Archana puran singh reveals she had to hide her marriage with parmeet sethi for four years ssv