• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pankaj tripathi condemns pointless abusive language on screen says most memes of him are fake scsg

शिव्या असणाऱ्या Memes वरुन पंकज त्रिपाठी संतापले; म्हणाले, “मिम्स तयार करणारे…”

मिर्झापूरमधील पंकज यांचे अनेक संवाद मिम्स म्हणून वापरले जातात

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • मिर्झापूर या वेब सीरीजमधून कालीन भय्यांच्या भूमिकेतून लोकांच्या मनात घर करुन गेलेले अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. मिर्झापूरमुळे पंकज हे आज घराघरात ओळखले जातात. या भूमिकेने पंकज यांना नवीन ओळख मिळून दिली. मात्र या भूमिकेतील अनेक गोष्टी या स्क्रीप्टचा भाग म्हणून करण्यात आल्याचं आणि त्यापद्धतीने आपण ही व्यक्तीरेखा उभं केल्याचं पंकज सांगतात.
    1/12

    मिर्झापूर या वेब सीरीजमधून कालीन भय्यांच्या भूमिकेतून लोकांच्या मनात घर करुन गेलेले अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. मिर्झापूरमुळे पंकज हे आज घराघरात ओळखले जातात. या भूमिकेने पंकज यांना नवीन ओळख मिळून दिली. मात्र या भूमिकेतील अनेक गोष्टी या स्क्रीप्टचा भाग म्हणून करण्यात आल्याचं आणि त्यापद्धतीने आपण ही व्यक्तीरेखा उभं केल्याचं पंकज सांगतात.

  • 2/12

    तसेच जोपर्यंत स्क्रीप्टमध्ये अश्लील शब्द आणि शिव्यांची गरज पडत नाही तोपर्यंत ऑनस्क्रीन हे शब्द वापरु नयेत असं पंकज यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या पंकज यांनी गरज असेल तिथेच अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत नाहीतर ऑनस्क्रीन अपशब्द वापरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.

  • 3/12

    मिड-डे या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी गरज असतानाच शिव्या वापरल्या जाव्यात असं मत व्यक्त केलं आहे. "जेव्हा कलाकार स्क्रीनवर काहीतरी विचित्र वागत असतात तेव्हा त्याला कथेचा काहीतरी संदर्भ असतो. कोणत्याही गोष्टीवर शिवी द्यावी असं मानणाऱ्यांमधला मी नाहीय. तसेच अशापद्धतीच्या शिवागाळा करणाऱ्या भाषेला पाठिंबाही देत नाही," असं पंकज सांगतात.

  • 4/12

    "माझ्या अनेक सीन्समध्ये मी असभ्य भाषा वापरली जाऊ नये यासाठी जागृक असतो. जोपर्यंत अशी भाषा वापरणे ही कथेची गरज ठरत नाही तोपर्यंत मी ती वापरणं टाळतो," असंही पंकज सांगतात.

  • 5/12

    खरं तर अपशब्द वापरावेत की नाही हा नैतिक विषय आहे. त्यामुळेच एक कलाकार म्हणून मी जे काही प्रेक्षकांसमोर ठेवतो त्याबद्दल मी नेहमीच जागृक असतो, असंही पंकज यांनी स्पष्ट केलं.

  • 6/12

    कथेमध्ये शिव्या असाव्यात की नाही यासंदर्भात निर्णय घेण्याची क्षमता ही कथेची मांडणी करणारे, लेखक आणि अभिनेत्यांवर असते, असं मतही पंकज यांनी व्यक्त केलं.

  • 7/12

    पंकज यांनी अश्लील भाषेतील संवादांवर आधारित मिम्ससंदर्भातही भाष्य केलं. मीम्स तयार करणारे संयमाने काम करतील आणि स्वत:ची जबाबदारी ओळखतील अशी मला अपेक्षा आहे, असं पंकज म्हणाले.

  • 8/12

    अनेकदा माझा फोटो असणाऱ्या मिम्समधील अपमान करणारे शब्द, अपशब्द हे माझ्या चित्रपटांमधील नसतात, असंही पंकज यांनी सांगितलं.

  • 9/12

    पंकज याच्या कालीन भय्या या पात्राच्या तोंंडी असणारे संवाद वापरुन तयार करण्यात आलेले अनेक मिम्स हे नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंकज यांचे हे विधान महत्वाचे ठरते.

  • 10/12

    लवकरच पंकज हे डिस्ने प्लस हॉटस्टारच्या आगामी क्रिमिनल जस्टिस या वेब सीरीजमध्ये झळकणार आहेत.

  • 11/12

    क्रिमिनल जस्टिस या वेब सीरीजमध्ये पंकज वकील माधव मिश्रा ही भूमिका साकारणार आहेत. पंकज यांचे चाहते या नवीन अवतारामध्ये त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

  • 12/12

    नुकतेच पंकज हे गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल, लूडो आणि मिर्झापूर यामधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (सर्व फोटो : सोशल नेटवर्कींगवरुन साभार)

Web Title: Pankaj tripathi condemns pointless abusive language on screen says most memes of him are fake scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.