बोल्ड फोटोशूट किंवा न्यूड फोटोशूट हे साधारणपणे बॉलिवूड अभिनेत्रींनी केल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. त्यांच्या तुलनेत मराठी अभिनेत्रींनी मात्र असं न्यूड फोटोशूट करण्याचं धाडस केल्याचं अद्याप कोणाच्याही पाहण्यात नसेल. परंतु, या सगळ्याला छेद दिला तो अभिनेत्री वनिता खरातने. ( सौजन्य : वनिता खरात इन्स्टाग्राम) सौंदर्याची परिभाषा ही रंग, रुप किंवा देहरचनेवर आधारित नसून खरं सौंदर्य हे आत्मविश्वास आणि स्वत: वर असलेलं प्रेम यावर आधारित आहे हे वनिताने दाखवून दिलं. काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट करुन वनिता चर्चेत आली. विशेष म्हणजे सर्व स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. वनिताने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केलं आहे. मात्र, या फोटोंव्यतिरिक्त वनिताचे असेच काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. न्यूड फोटो इतकीच वनिता मराठमोळ्या साजशृंगारात खुलून दिसते. ठसकेबाज शैलीत वनिताने केलेल्या फोटोशूटचीदेखील सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. वनिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच तिने अनेक रिअॅलिटी शो, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाहिद कपूरचा तुफान गाजलेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटात वनिताने पुष्षा ( शाहिद कपूरची मोलकरीण) ही भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला' महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिअॅलिटी शोची वनिता विजेती आहे. 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटातही ती झळकली आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' हे नाटकदेखील तिने केलं आहे. -
वनिताचा मराठमोळा साजशृंगार
कधी न्यूड, तर कधी साजशृंगार! वनिता खरातचा हटके अंदाज
Web Title: Bold look marathi actress vanita kharat photoshoot ssj