-
मराठीतील बोल्ड,बिनधास्त अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. अभिनयाबरोबरच बोल्डनेसमुळेही नेहा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
-
मागच्यावर्षी करोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आला. या काळात प्रत्येकालाच काही महिने आपल्या घरातच थांबावे लागले. कलाकारही याला अपवाद नव्हते.
-
लॉकडाउनच्या या काळाने प्रत्येकाला काही ना काही शिकवले. आता अभिनेत्री नेहा पेंडसेचेच घ्या ना.
-
लॉकडाउनच्या काळात नेहा पक्की गृहिणी बनली. गृहिणी म्हणजे काय? त्या जबाबदाऱ्या कशा निभवायच्या असतात, त्या गोष्टी नेहा शिकली.
-
"वयाच्या दहाव्या वर्षापासून मी अभिनय करतेय. इतका मोठा काळ मी कधीच घरी थांबले नाही. त्यामुळे घरासाठी मी सर्वस्वी आईवर अवलंबून असायचे".
-
"पण मागच्यावर्षी जानेवारीत माझे लग्न झाले. लॉकडाउनमध्ये आपण अडकलो आणि त्यानंतर सर्व गोष्टी बदलून गेल्या. आता करीयरसोबत घर कसं चालवायचं ते सुद्धा मी शिकले आहे" असे नेहाने सांगितले.
-
नेहाने मराठी, हिंदीच्या बरोबरीने दक्षिणेतील चित्रपटांमध्येही काम केले आह. अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यात 'मे आय कम इन मॅडम' सारख्या विनोदी मालिका आहेत.
-
"मला अभिनय भरपूर आवडतो. काही वेळा शूटिंगच्या सेटवर कायमस्वरुपी रहावे असे वाटायचे. बाल कलाकार म्हणून मी सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. मला माझ्या भूमिकेमध्ये प्रयोग करणे आवडते. त्यामुळेच 'भाभी जी घर पर हैं' मालिका स्वीकारली असे नेहाने सांगितले.
-
विनोदी मालिकांमध्ये काम करायला आवडत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळेच 'भाभी जी घर पर हैं' मालिका स्वीकारल्याचे तिने सांगितले. मी वेगवेगळया प्रदेशातील भूमिका केल्या आहेत. प्रादेशिक सिनेमांमध्ये मी बरीच वर्ष काम केले आहे. त्यामुळेच यूपीवर आधारीत व्यक्तीरेखा साकारायची माझी इच्छा होती, असे नेहाने सांगितले.
-
'भाभी जी घर पर हैं' मध्ये नेहा पेंडसे सौम्या टंडनच्या जागी अनिता भाभीची भूमिका साकारणार आहे. अनिता भाभीच्या रोलमध्ये सौम्याने आपला एक ठसा उमटवला आहे. त्यामुळे नेहाला तो रोल तितक्याच ताकदीने साकारावा लागणार आहे.
…म्हणून मराठीतील बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री नेहा पेंडसे बनली ‘भाभी जी’
Web Title: Now actress nehha pendse become anita bhabhi in bhabi ji ghar par hain dmp