
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. ( सौजन्य : मिताली मयेकर/ सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम पेज) गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला या दोघांनी लग्न केलं. पुण्यातील ढेपेवाडा येथे मोठ्या थाटामाटात ही जोडी विवाहबद्ध झाली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि मितालीने लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्याचे, विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हळद,मेहंदी, ग्रहमख या कार्याचे फोटो शेअर केल्यानंतर सिद्धार्थ-मितालीने त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. हा लग्नसोहळा खास व्हावा यासाठी प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलं आहे. या लग्नसोहळ्यात मिताली आणि सिद्धार्थ अत्यंत सुंदर दिसत असून ही जोडी मेड ऑफ इच अदर असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. लग्नात मितालीने पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी, खोपा, दागदागिने परिधान केले होते. सिद्धार्थने देखील रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. तसंच सोबत शेलादेखील घेतला होता. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?
Web Title: Marathi actor siddharth chandekar and mitali mayekar wedding photos ssj