-
दोनच दिवसांपूर्वी अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस'मध्ये अभिनेता वरुण धवन प्रेयसी नताशा दलाल बरोबर विवाहबद्ध झाला. (फोटो सौजन्य – वरुण धवन इन्स्टाग्राम)
-
वरुण आणि नताशा शाळेत असल्यापासून परस्परांना ओळखत होते. पण कॉलेजच्या दिवसापासून त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलण्यास सुरुवात झाली. माध्यमांमध्ये या विवाहाची बरीच चर्चा आहे.
-
लग्नानंतर वरुण-नताशावर बॉलिवूडमधील मित्र मंडळी तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथने सुद्धा वरुणला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
पण उपरोधिक पद्धतीने तिने हा शुभेच्छा संदेश लिहिला आहे. वरुणच करिअर आता मर्यादीत होईल. नताशा आणि वरुणचे सासू-सासरे त्याला दुसऱ्या हिरॉईनसोबत पडद्यावर रोमान्स करण्याची परवानगी देणार नाहीत. (फोटो सौजन्य – श्रद्धा श्रीनाथ इन्स्टाग्राम)
-
वरुणला आपण पुन्हा ऑनस्क्रिन पाहू शकणार नाही, हे फारच दु:खद आहे. वरुणने दुसऱ्या हिरॉईनसोबत काम करणं, पत्नी नताशा आणि त्याच्या सासू-सासऱ्यांना रुचणार नाही, ही सहाजिक गोष्ट आहे असे श्रद्धा श्रीनाथने म्हटले आहे.
-
आता वरुण पुरुष प्रधान चित्रपटांकडे वळू शकतो. असे चित्रपट करण्याला तो जास्त प्राधान्य देईल. व्यक्तीगत जीवन आणि पेशा यांचे संतुलन साधणे कठिण आहे. त्याची उणीव जाणवेल. वरुण तुला लग्नाच्या शुभेच्छा असे श्रद्धाने तिच्या मेसेजमध्ये लिहिले आहे.
-
२४ जानेवारीला अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस'मध्ये वरुण विवाहाच्या बोहल्यावर चढला. मोजक्या ४० ते ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले.
-
करण जोहर, शशांक खेतान, मनिष मल्होत्रा आणि कुणाल कोहली अशी चित्रपट सृष्टीतून मोजकी मित्र मंडळी लग्नाला उपस्थित होती.
-
लग्नानंतर आता वरुण-नताशाचे जुने फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तेव्हा आणि आता, असे जुने आणि नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर चाहत्यांनीच जुने आणि नवीन फोटो एकत्र करुन, व्हायरल केले आहेत. लग्नाचा आणि कॉलेजच्या दिवसांमधला फोटो एकत्र करण्यात आला आहे.
-
वरुण धवनने इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना कॅप्शन देताना म्हटलं आहे की, "Life long love just became official." (Photo: Varun Dhawan/Instagram)
‘वरुणने आता दुसऱ्या अभिनेत्रींसोबत…’; श्रद्धा श्रीनाथचा नताशा दलालला अडचणीत टाकणारा प्रश्न
Web Title: Shraddha srinath asks if natasha dalal will accept varun dhawan romancing other heroines in films dmp