-
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या कलाकारांकडे लग्झरी गाड्या, आलिशान घरे असतात. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मुंबईत घर खरेदी केलेले नाही. ते मुंबईत भाडे तत्वावर राहतात. चला जाणून घेऊया अशाच काही कलाकरांविषयी..
-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे.
-
नवाज गेल्या १५ वर्षांपासून मुंबईत राहात आहे. तो वर्सोवा येथील अपार्टमेंटमध्ये भाडे तत्वावर राहतो.
-
राजकुमार रावने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
राजकुमार गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत अंधेरीमधील ओबेरॉय स्प्रिंग येथे राहतो. एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या राजकुमारचे मुंबईत स्वत:चे असे घर नाही.
-
अभिनेता विद्युत जामवाल हा अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे.
-
विद्युतने अद्याप मुंबईत घर खरेदी केलेले नाही.
-
अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या १७ वर्षांपासून मुंबईत राहत आहे.
-
पण कतरिनाने मुंबईत घर खरेदी केलेले नाही.
-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
-
ती वांद्रे परिसरात भाडे तत्वावर राहात होती. पण आता प्रियांका चोप्राच्या जुहू येथील घरात भाडे तत्वावर राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अभिनेत्री ऋचा चड्ढा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहते.
-
पण तिने अद्याप घर खरेदी केलेले नाही.
-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री हुमा खरैशी ही सतत चर्चेत असते.
-
ती अंधेरी येथील अपार्टमेंटमध्ये भाडे तत्वावर राहते.
कोट्यावधी रुपये कामावूनही ‘हे’ कलाकार राहतात भाड्याच्या घरात
जाणून घ्या या कलाकारांविषयी…
Web Title: These bollywood stars live on rented apartment do not have their own house in mumbai avb