• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity actress prarthana behere director filmmaker abhishek jawkar celebrates 4 years of togetherness love story romantic photos sdn

प्रार्थना-अभिषेकच्या सहवासाची चार वर्षे; जाणून घ्या तिच्या नवऱ्याविषयी

August 16, 2021 14:47 IST
Follow Us
  • Prarthana Behere Abhishek Jawkar Love Story Romantic Photos
    1/25

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर.

  • 2/25

    प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री असल्याचे आपल्याला माहित आहे. पण तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल.

  • 3/25

    अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने अ‍ॅरेन्ज मॅरेज केले आहे.

  • 4/25

    एका मुलाखतीत याबद्दल प्रार्थना म्हणाली की, 'अभिषेक आणि माझ्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्याने तो चांगला जोडीदार ठरू शकतो असं मला वाटलं. त्यामुळे त्याला पसंत केलं.'

  • 5/25

    प्रार्थना आणि अभिषेक गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत.

  • 6/25

    विवाह मंडळाच्या माध्यमातून प्रार्थना आणि अभिषेक यांचे लग्न ठरले.

  • 7/25

    १४ नोव्हेंबर २०१७ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 8/25

    अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

  • 9/25

    अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले.

  • 10/25

    तेथूनच चित्रपटांच्या रिळी खरेदी करण्यापासून त्याचा प्रवास सुरु झाला. यानंतर त्याने फॉक्स एण्टरटेंमेन्ट आणि हिस्टरी वाहिनीसाठी माहितीपट तयार करण्यास सुरुवात केली.

  • 11/25

    अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले असून, तो तेथे यशस्वीही ठरला.

  • 12/25

    मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे.

  • 13/25

    'यमुदू', 'गोलिमार' आणि तेलगूमध्ये डब केलेल्या 'हॅरी पॉटर' सीरिजचे वितरणही अभिषेकनेच केले.

  • 14/25

    जवळपास पाच वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली.

  • 15/25

    'डब्बा ऐस पैस', 'शुगर, सॉल्ट आणि प्रेम' या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे.

  • 16/25

    'मिसिंग ऑन अ वीकेंड' या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

  • 17/25

    चित्रपट क्षेत्रातीलच जोडीदाराची निवड केल्याबद्दल प्रार्थना सांगते की, 'अभिनेत्री व्हायचं माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला लेखक किंवा दिग्दर्शक होण्यात रस होता. सतत फिटनेस आणि मेकअपबद्दल बोलणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मी कधीच मिसळू शकत नाही. चित्रपट निर्मितीमध्ये मला जास्त आवड आहे. लेखक आणि दिग्दर्शकांसोबत गप्पा मारायला मला खूप आवडतं.'

  • 18/25

    सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.

  • 19/25

    प्रार्थनाने आधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी चित्रपटातून पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • 20/25

    २००९ पासून सक्रीय असलेल्या प्रार्थनाने आतापर्यंत १५ पेक्षा जास्त चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

  • 21/25

    प्रार्थनाचे 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'बायकर्स अड्डा' आणि 'व्हॉट्स अ‍ॅप लग्न' हे चित्रपटसुद्धा बरेच गाजले.

  • 22/25

    प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.

  • 23/25

    अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.

  • 24/25

    लवकरच प्रार्थना एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छूमंतर' असं या सिनेमाचं नाव असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलंय.

  • 25/25

    (सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर / इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi celebrity actress prarthana behere director filmmaker abhishek jawkar celebrates 4 years of togetherness love story romantic photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.